होय..आम्हीच दहशतवादी हल्ला केला होता, पाकड्यांची कॅमेऱ्यासमोर कबुली, औरंगजेब म्हणाला...

Pakistani Air Force officer Pulwama : २०१९ च्या पुलवामा हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याची कबुली समोर आली आहे. औरंगजेब अहमद यांचा कॅमेऱ्यासमोरचा खुलासा भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा ठरणार.
Pakistan on Operation Sindoor
Pakistan on Operation Sindoor
Published On

Pakistan on Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई केली. भारताने सर्वच बाजूने पाकिस्तानले वेढलेय. त्यामुळे विश्वासघातकी पाकिस्तानने शस्त्रसंधीचा हात पुढे केला. आम्ही दहशतवाद्यांना आसरा देत नाही म्हणणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटला गेलाय. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याने कॅमेऱ्यासमोरच पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण असतानाच पाक अधिकाऱ्याच्या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

२०१९ मध्ये पुलमावा भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले होते. पाकिस्तानकडून वारंवार हा हल्ला नाकारला जात होता. दहशतवादी आणि आमचा संबंध नाही. आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात असल्याचे सांगणारा पाकिस्तान आता तोंडावर पडलाय. हवाई दलाच्या अधिकाऱ्याने पुलवामा हल्ल्या निर्लज्जपणे पाकिस्तानचे राजकीय कौशल्या असल्याचे म्हटलेय. सहा वर्षानंतर पाकड्यांनी दहशतवाद्यांची कबुली दिली.

Pakistan on Operation Sindoor
Pulwama Attack: 14 फेब्रुवारीचा तो काळा दिवस...; पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला कसा झाला? वाचा

विदेशी मीडियासमोरच कबुली

पाकिस्तानचे वायु अधिकारी औरंगजेब अहमद याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली. औरंगजेब म्हणाला की, 'पाकिस्तानी सैनिकांकडे जबरदस्त कौशल्य आहे. २०१९ मध्ये पुलमामामध्ये रणनिती कौशल्य दाखवले.' विदेशी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरच औरंगजेबने पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली दिली. पुलवामा हल्ल्याची कबुली देत पाकिस्तानचा पहलगामध्येही हात असल्याच्या आरोपाला एकप्रकारे हवा दिली. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तान दहशतवादाविरोधात आहे. दहशतवाद्यांचा सर्वात मोठा फटका पाकिस्तानला बसत असल्याचेही ते म्हणाले.

Pakistan on Operation Sindoor
India-Pakistan War : पुन्हा मोठं काहीतरी घडणार? शस्त्रसंधीनंतरही PM मोदींची तिन्ही सेनाप्रमुखांसोबत बैठक

पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यातील आपला सहभाग नाकारला होता. पण पुलवामा हल्ल्याबाबतच् पाक अधिकाऱ्याच्या या कबुलीमुळे त्यांच्या दाव्यांवर संशय निर्माण झाला आहे. औरंगजेब यांनी म्हटले की, "पुलवामामध्ये आम्ही आमची सामरिक क्षमता दाखवली." यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झालाय. भारताने यापूर्वीही २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बालाकोट येथे हवाई हल्ले केले होते, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता.

Pakistan on Operation Sindoor
Pune News: भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी

भारत आणि पाकिस्तानने १० मे रोजी शस्त्रसंधी करारावर सहमती दर्शवली होती, परंतु काही तासांतच पाकिस्तानने ड्रोन हल्ले करून कराराचा भंग केला. यामुळे सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय, विशेषतः अमेरिकेने दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. या घडामोडींमुळे भारत-पाक संबंधांवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या या कबुलीमुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली आहे, तर पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com