India Pakistan War
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यामध्ये दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलाय. दोन्ही देशांत गोळीबार, ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने शांततेचे आवाहन केले, पण तणाव कायम आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.