Republic Day 26 : 'उरी' ते 'राझी'; प्रजासत्ताक दिनाला लहान मुलांना आवर्जून दाखवा 'हे' देशभक्तीपर चित्रपट

Shreya Maskar

उरी

उरी (Uri: The Surgical Strike) हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला. चित्रपटात मुख्य भूमिकेत विकी कौशल झळकला आहे. 'उरी'चे दिग्दर्शन आदित्य धरने केले आहे.

Uri | instagram

शेरशाह

शेरशाह (Shershaah) चित्रपट 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा जवान विक्रम बात्रा यांच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटात कियारा अडवाणी देखील पाहायला मिळत आहे.

Shershaah | instagram

बॉर्डर

बॉर्डर (Border) चित्रपट 1997 मध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट जे. पी. दत्ता यांनी दिग्दर्शित केला आहे. हा भारत-पाकिस्तानमधील युद्धावर आधारित एक युद्धपट आहे. यात सनी देओल, सुनील शेट्टी असे अनेक कलाकार पाहायला मिळतात.

Border | google

राझी

2018 ला आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला राझी (Raazi) चित्रपट रिलीज झाला. हा स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात विकी कौशल, रजित कपूर, शिशिर शर्मा आणि जयदीप अहलावत सहाय्यक भूमिकेत आहेत.

Raazi | instagram

द गाझी अटॅक

द गाझी अटॅक (Ghazi) चित्रपट 2017 ला रिलीज झाला आहे. चित्रपटात राणा दगुबत्ती, के. के. मेनन, तापसी पन्नू आणि अतुल कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

Ghazi | instagram

LOC : कारगिल

2003 साली 'LOC : कारगिल' (LOC: Kargil) चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट जे.पी दत्ता दिग्दर्शित आहे. तसेच चित्रपट कारगिल युद्धावर आधारित आहे.

LOC: Kargil | google

स्काय फोर्स

अक्षय कुमार मुख्य भमिकेत असलेला स्काय फोर्स (Sky Force) चित्रपट 2025 ला रिलीज झाला. हा चित्रपट भारत-पाकिस्तान हवाई युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात वीर पहारिया महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Sky Force | instagram

गुंजन सक्सेना

2020 ला गुंजन सक्सेना (Gunjan Saxena: The Kargil Girl) चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

Gunjan Saxena | instagram

NEXT : काळी साडी, नाजूक कंबर अन् मराठमोळा साज श्रृंगार; तिळगुळाहून गोड ज्ञानदाचं सौंदर्य

Dnyanada Ramtirthkar Photos | instagram
येथे क्लिक करा...