Shreya Maskar
सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका तुफान गाजत आहे. या मालिकेत मुख्य अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने मकर संक्रांत स्पेशल फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून चाहते तिच्या सोंदर्यावर घायाळ झाले आहेत.
ज्ञानदाने सुंदर काळ्या रंगाची काठापदराची साडी नेसली आहे. त्यांच्यासोबत गुलाबी ब्लाउज घातला आहे. तिने मराठमोळा लूक केला आहे.
केसांची सुंदर हेअर स्टाइल, कपाळावर बिंदी, मिनिमल मेकअप, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा असा तिने साज श्रृंगार केला आहे. ती खूपच गोड दिसत आहे.
हिरव्यागार परिसरात, कोवळ्या उन्हात ती सुंदर पोज देताना दिसत आहे. उन्हात तिचे सौंदर्य आणखी चमकत आहे. जणू 'उन्हात चांदणं पडलं...'
ज्ञानदाने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "कुठे राहीले आमचे अहो…? मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या आणि तुमच्या प्रेमाचा गोडवा पसरवत राहा!"
ज्ञानदाच्या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. उदा. "सुंदर Diamond", "माझा गोड तिळगूळ लाडू", "खूपच सुंदर दिसतेय", "तिळगूळापेक्षाही गोड आहेस..."
अलिकडेच ज्ञानदाचा साखरपुडा पार पडला आहे. तिने प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर हर्षद आत्मारामसोबत गुपचूक साखरपुडा उरकला. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसतात.
ज्ञानदा आणि हर्षद अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. चाहते आता तिच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ज्ञानदाने अनेक मराठी मालिक आणि नाटकांमध्ये काम केले आहे.