Shreya Maskar
आज (13 जानेवारी 2026) प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा 67 वा वाढदिवस आहे. त्यांनी मराठीसोबत हिंदी, साऊथ इंडस्ट्री देखील गाजवली आहे. ते राजकारणात देखील सक्रिय आहे.
करिअरच्या सुरूवातीच्या काळात त्यांनी पैशांसाठी वॉचमनची नोकरी देखील केली. त्यातून त्यांना 165 रुपये मिळायचे.
सयाजी शिंदेंचा जन्म महाराष्ट्रातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी वॉचमनच्या नोकरीनंतर क्लार्कची नोकरी, बँकेत नोकरी देखील केली.
सयाजी शिंदे यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांना 'झुलवा' नाटकामधून खूप लोकप्रियता मिळाली. सध्या ते 'सखाराम बाईंडर' या नाटकामुळे चर्चेत आहेत.
सयाजी शिंदे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आले. त्यांनी अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका केली. ज्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.
सयाजी शिंदे यांनी 1999 मध्ये रिलीज झालेल्या 'शूल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. अभिनेत्यासह ते निर्माते देखील आहेत.
सयाजी शिंदे हे सामाजिक कार्यकर्तेही आहेत. लोकांचे प्रश्न जाणून त्यांच्यासाठी कायम काम करताना ते दिसतात. त्यांचे पाय मातीशी जोडलेले आहे.
अभिनेते कायम लोकांना पर्यावरण जपण्याचा संदेश देतात. झाडे लावायला सांगतात. सयाजी शिंदे कोट्यवधींचे मालक असूनही साधे राहणीमान ठेवतात.