Shreya Maskar
'बिग बॉस मराठी ६'मध्ये एन्ट्री घेतलेला प्रभू शेळके हा जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या छोट्याशा गावातील रहिवासी आहे.
सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे इन्स्टाग्राम 2.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. तो 'काळू डॉन' म्हणून लोकप्रिय आहे.
प्रभू शेळके प्रसिद्ध रील स्टार आहे. आपल्या कॉमेडी आणि अभिनय शैलीने त्याने लोकांना आपलं केल आहे. गरीब कुटुंबातून त्याने हे यश मिळवले आहे.
पहिल्याच दिवशी विशाल कोटियन प्रभू शेळकेची त्याच्या उंचीवरून खिल्ली उडवतो. तेव्हा 'काळू डॉन' आपल्या आजाराविषयी बोलताना दिसतो.
प्रभू शेळके यांनी बिग बॉसच्या घरात सांगितले की, दर महिन्याला माझे रक्त बदलावे लागते. रक्त बदलण्यासाठी तीन तास लागतात. उपचारांसाठी आईवडिलांनी वावर विकल्याचे त्याने सांगितले.
प्रभू शेळकेला गेल्या आठ वर्षांपासून 'थॅलेसेमिया' हा आजार आहे. "या आजारात शरीरातील रक्तपेशी नष्ट होत असतात, त्यामुळे दर महिन्याला मला रक्त बदलावे लागते... " असे प्रभू म्हणाला.
थॅलेसेमिया हा एक आनुवंशिक रक्तविकार आहे, ज्यात शरीरात हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशी कमी प्रमाणात तयार होतात, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि ऑक्सिजनचा पुरवठा घटतो.
'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री करताना त्याने शॉर्टकटचा मार्ग न निवडता मेहनतीचा मार्ग निवडला. तो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहे.