Shreya Maskar
'बिग बॉस मराठी 3' विजेता विशाल निकमने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्याने होणाऱ्या बायकोसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
मराठी अभिनेता विशाल निकमला 'बिग बॉस मराठी 3'मुळे खूप लोकप्रियता मिळाली. सध्या तो 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत मुख्य हिरोच्या भूमिकेत दिसत आहे. यात त्याने रायाची भूमिका साकारली.
विशालने सोशल मीडियावर एक मुलीसोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. ज्याला त्याने खूपच खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "माझी सौंदर्या..." त्यामुळे अभिनेता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोले जात आहे.
फोटोमध्ये विशालने आपल्या होणाऱ्या बायकोचा चेहरा दाखवला नाही. मात्र फोटोमधील ती मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून मराठी अभिनेत्री अक्षया हिंदळकर असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे.
बिग बॉसच्या घरात असताना विशालने आपल्या आयुष्यातील 'सौंदर्या' बद्दल खूपदा बोलला. तेव्हा पासून चाहते विशालच्या 'सौंदर्या'ला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
विशालने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे अभिनेता आता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोले जात आहे.
विशाल आणि अक्षया हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेक वेळा एकत्र स्पॉट होतात. एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करतात. एकमेकांसोबत फोटो देखील पोस्ट करतात. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते.
'साता जन्माच्या गाठी' या मराठी मालिकेत अक्षया हिंदळकर आणि विशाल निकमने एकत्र काम केले होते. चाहते आता विशाल होणाऱ्या बायकोचा चेहरा कधी दाखवणार, याची वाट पाहत आहे.
NEXT :