Hrithik Roshan Birthday : बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत स्टार किडची संपत्ती किती? जगतोय लग्जरी लाइफस्टाइल

Shreya Maskar

हृतिक रोशन वाढदिवस

आज (10 जानेवारी 2026) बॉलिवूड हिरो हृतिक रोशनचा वाढदिवस आहे. हृतिक आज 52 वर्षांचा झाला आहे. तो अभिनेते राकेश रोशन यांचा लेक आहे.

Hrithik Roshan | instagram

पहिला चित्रपट

हृतिक रोशनने 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'कहो ना... प्यार है' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्याने आजवर 'वॉर', 'जोधा अकबर', 'क्रिश', 'धूम २', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' असे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत.

Hrithik Roshan | instagram

कमाईचे माध्यम

हृतिक रोशन चित्रपटासोबतच ब्रँड जाहिराती, प्रोडक्शन हाऊस, फिटनेस, लाइफस्टाइल ब्रँड HRX यांमधून बक्कळ पैसा कमावतो. हृतिक रोशन बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार किड आहे.

Hrithik Roshan | instagram

प्रॉपर्टी

हृतिक रोशनचे मुंबईतील जुहू येथे आलिशान घर आहे. लोणावळ्यात फार्महाऊस आहे. तसेच त्याने अनेक ठिकाणी गुंतवणूक करून ठेवली आहे.

Hrithik Roshan | instagram

कार कलेक्शन

हृतिक रोशनकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. यात रोल्स-रॉइस, मर्सिडीज-मेबॅक, पोर्श केयेन टर्बो यांसारख्या गाड्या आहेत. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.

Hrithik Roshan | instagram

चित्रपटाचे मानधन

हृतिक रोशन एका चित्रपटासाठी जवळपास 75-100 कोटी रुपये घेतो. तसेच एका जाहिरातीसाठी 8-10 कोटी मानधन घेतो.

Hrithik Roshan | instagram

वैयक्तिक आयुष्य

हृतिक रोशनने 2000 मध्ये सुजैन खानशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सध्या हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे. ते चार वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहेत.

Hrithik Roshan | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, हृतिक रोशनची संपत्ती जवळपास 3,100 कोटी रुपयांच्या वर आहे. हृतिक रोशन एक स्टार किड आहे. तो अभिनेत्यासोबतच एक सुपर डान्सर देखील आहे.

Hrithik Roshan | instagram

NEXT : हॉटनेसचा तडका! अमृता खानविलकरचा लाल ड्रेसमध्ये किलर लूक, पाहा PHOTOS

Amruta Khanvilkar | instagram
येथे क्लिक करा...