Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिची आगामी वेब सीरिज 'तस्करी: द स्मगलर्स वेब' (Taskaree: The Smugglers Web ) मुळे चर्चेत आहे.
अमृता खानविलकर या वेब सीरिजमध्ये बॉलिवूडचा हिरो इमरान हाश्मी सोबत झळकणार आहे. Taskaree वेब सीरिजचे दिग्दर्शक नीरज पांडे आहेत.
अमृता खानविलकरने हा हॉट लूक 'तस्करी'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी केला होता. तिने सोशल मीडियावर याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अमृता खानविलकर क्लासी रेड गाऊन परिधान केला आहे. त्यावर लाल रंगाचे जॅकेट घातले आहे. तिचा हा किलर लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे.
अमृताने लूकला मॅचिंग गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे. गोल्ड ब्रेसलेट आणि गोल्ड कानातले यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. नखांना ब्लॅक नेलपेंट लावले आहे.
केसांचा वेव्ही लूक तिने केला आहे. मोकळ्या केसांत अमृता जणू अप्सरा दिसत आहे. तिने हाय हिल्स घातले आहेत. लूकला शोभेल असा मेकअप तिने केला आहे.
'तस्करी' सीरिजमध्ये झोया अफरोज, फ्रेड्डी दारुवाला, अनुजा साठे, नंदिश सिंग संधू आणि शरद केळकर हे कलाकार झळकणार आहेत.
Taskaree वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सीरिजचा 14 जानेवारी 2026 रोजी रिलीज होणार आहे.