Shreya Maskar
महाराष्ट्राच्या 'फुलवंती' प्राजक्ता माळी लवकरच नव्याकोऱ्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेब सीरिजचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
प्राजक्ता माळीची 'रानबाजार' ही वेब सीरिज खूप गाजली. यात प्राजक्ता माळीचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. यात प्राजक्तासोबत तेजस्विनी पंडित झळकली.
प्राजक्ता माळीच्या नवीन वेब सीरिजचे नाव 'देवखेळ' असे आहे. ही एक थ्रिलर वेब सीरिज आहे. ज्यामुळे चाहते यासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
वेब सीरिजच्या पोस्टरला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "पाप करणाऱ्यांचा हिशोब होणार!" या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'देवखेळ'मध्ये प्राजक्ता माळी मराठमोळा हँडसम हिरो अंकुश चौधरीसोबत काम करणार आहे. पुन्हा एकदा प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरीला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांनी 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या मराठी चित्रपटात काम केले होते.
'देवखेळ' वेब सीरिजची रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नाही. मात्र ही वेब सीरिज झी 5 वर पाहायला मिळणार आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ती एक उत्तम अभिनेत्री, निर्माती, व्यवसायिका, कवियत्री आहे. तिचा 'फुलवंती' चित्रपट जगभरात खूप गाजला.