Shreya Maskar
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आज 42 वर्षांचा झाला आहे. त्याचा आज (6 जानेवारी 2026) वाढदिवस आहे.'इश्क दा उडा अड्डा' हा दिलजीतचा पहिला अल्बम 2004 ला रिलीज झाला. या अल्बममुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली.
'५ तारा' हे गाणे ब्रेकअपच्या दुःखावर आहे. दमदार ढोलच्या तालावर हे गाणे भन्नाट वाजत आहे. या गाण्यातून ब्रेकअपनंतर दिलजीत पंचतारांकित हॉटेलमध्ये जाताना दिसतो.
'डू यू नो' हे एक रोमँटिक गाणे आहे. हे गाणे आजही सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. गाण्यातील दिलजीतचा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
'लॅम्बर्गिनी' गाण्यात लग्जरी लाइफ स्टाइलला दिलजीतने पारंपरिक टच दिला आहे. गाण्यात एक स्टायलिश कार पाहायला मिळत आहे.
'बॉर्न टू शाइन' हे गाणे कठोर परिश्रमाने मिळवलेल्या यशाचे सेलिब्रेशन करणारे आहे. हे 'G.O.A.T.' अल्बममधील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे.
'लव्हर' या गाण्यात दिलजीतने पंजाबी संगीताला एक नवीन रेट्रो फील दिला आहे. ज्याच्या तालावर आजही प्रेक्षक थिरकतात.
भारतीय आणि पाश्चात्य पॉप संगीताचा अनोखा संगम 'हस हस' गाण्यात दिसत आहे.
'भूल भुलैया 3' चे टायटल ट्रॅक जगभरात प्रसिद्ध आहे. या गाण्यात कार्तिक आर्यन देखील आहे. 'भूल भुलैया 3' चित्रपट थिएटरमध्ये तुफान गाजला.