"असा धडा शिकवणार की...", मुनीरनंतर शरीफनेही गरळ ओकली, भारताला पुन्हा पोकळ धमकी

Pakistan Shehbaz Sharif Sindhu water treaty threat to India : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला सिंधू पाणी करारावरून धमकी दिली की, पाकिस्तानच्या पाण्याचा एक थेंबही हिसकावू देणार नाही. भारताने स्पष्ट केले की, अण्वस्त्र ब्लॅकमेलपुढे तो कधीही झुकणार नाही आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावले उचलत राहील.
Pakistan Shehbaz Sharif Sindhu water
PAKISTAN WARNS INDIA OVER WATER TREATY, NUCLEAR THREAT ISSUED – INDIA RESPONDSgoogle
Published On
Summary
  • पाकिस्तानचा पुन्हा पोकळ धमकी शो: शरीफ आणि मुनीरची भारताविरुद्ध गरळ

  • सिंधू पाणी करारावरून पाकिस्तानची बेताल वक्तव्ये, भारताचे कडक प्रत्युत्तर

  • अण्वस्त्र हल्ल्याची धमकी, भारताचा ठाम इशारा – "ब्लॅकमेलपुढे झुकणार नाही"

India Pakistan tensions, Shehbaz Sharif threat : भारताला पाकिस्तानच्या पाण्याचा एक थेंबही घेऊन देणार नाही, असा इशारा पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केले आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताने पाकिस्तानवर अनेक दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये १९६० चा सिंधु पाणी करारही स्थगित करण्यात आला. पाकिस्तानकडून वारंवार इशारा दिल्यानंतरही भारताकडून पाणी अडवण्यात आले आहे. पाणी रोखण्याच्या या कृतीला युद्धाची कारवाई म्हटले जाईल, अशी गरळ शरीफ यांनी ओकली आहे. दरम्यान अमेरिकेतली फ्लोरिडामधून पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी भारताला युद्धाचा इशारा दिला होता. पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर अणुबॉम्बची धमकी भारताला दिली होती. त्यानंतर आता शरीफ यांनीही मुक्तफळे उधळली आहेत. India Pakistan water dispute latest news 2025

पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गरळ ओकली. ते म्हणाले की, "तुम्ही आमचं हक्काचे पाणी अडवण्याची धमकी दिली, तर हे लक्षात ठेवा की तुम्ही पाकिस्तानच्या पाण्याचा एक थेंबही हिसकावू शकत नाही, असे मी आज शत्रूला सांगतोय." भारताने जर अशी कोणतीही कारवाई केली, तर तुम्हाला पुन्हा असा धडा शिकवला जाईल की तुम्हाला पश्चाताप करावा लागेल, असा इशाराही यावेळी शरीफ यांनी दिला.

Pakistan Shehbaz Sharif Sindhu water
Accident : भाविकांवर काळाचा घाला, पिकअपचा भयंकर अपघात, १० जणांचा मृत्यू, ७ मुलांचा समावेश

आसीम मुनीरचेही बेताल वक्तव्य -  

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसीम मुनीर यांनी अमेरिकामधून भारताला पोकळ धमकी दिली. अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना आसीम यांनी भारताला थेट इारा दिला. भविष्यात युद्धात पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास अण्वस्त्र हल्ल्याची धमकी आसीम यांनी दिली होती. मुनीर असेही म्हणाले की, जर भारताने पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आणला, तर इस्लामाबाद भारताच्या पायाभूत सुविधांचा नाश करेल.

Pakistan Shehbaz Sharif Sindhu water
क्रिकेटविश्वात खळबळ! भारताच्या माजी क्रिकेटरला ईडीची नोटीस, आज चौकशी, नेमकं प्रकरण काय?

भारताचे प्रत्युत्तर -

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीम मुनीर यांच्या धमकीला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. भारताने म्हटले की, अण्वस्त्रांच्या धमक्या देणे ही शेजारील देशाची सवय आहे. मुनीर यांच्या विधानाने लष्कर आणि दहशतवादी गटांशी संगनमत असलेल्या पाकिस्तानातील अण्वस्त्र कमांड आणि नियंत्रणाच्या विश्वासार्हतेवर असलेल्या संशयांना आणखी बळकटी दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, तो अण्वस्त्र ब्लॅकमेलपुढे झुकणार नाही आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावले उचलत राहील.

Pakistan Shehbaz Sharif Sindhu water
Maharashtra Politics : काँग्रेसचा गड ढासळला! सांगलीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com