India Pakistan Tension
फाळणीपासूनच भारत-पाकिस्तान या दोन देशांत तणावपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे शेजारील राष्ट्रांमध्ये नेहमीच तणाव असतो. २२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगामवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा जीव गेला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. त्यानंतर पाकिस्तानने मिसाईल आणि ड्रोन वापरुन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अशाच तणावपूर्ण संंबंधांमुळे भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते.