
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी रोहित आणि विराट सराव करताना दिसले.
सरावापूर्वी दोघांनी पाकिस्तानी चाहत्याला ऑटोग्राफ देत खास भेट दिली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Virat Kohli : १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यानंतर संघाने लगेच तयारीला सुरूवात केली. जवळपास सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार रोहित शर्मा आणि विराट कोहली नेट्समध्ये सराव करताना दिसले. सराव सत्रापूर्वी एका पाकिस्तानी चाहत्याने दोघांचा भेट घेतली.
भारतीय संघाच्या सराव सत्रापूर्वी एक पाकिस्तानी चाहता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आला. संघ सरावासाठी हॉटेलमधून बाहेर पडताच तो चाहता टीमच्या बसजवळ उभा राहिला. त्याने विराट कोहलीला त्याच्या आरसीबी जर्सीवर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. विराटनेही त्याची ही इच्छा पूर्ण करत जर्सीवर ऑटोग्राफ दिला.
विराट पाठोपाठ रोहित शर्माही पाकिस्तानी चाहत्याच्या समोर आला. रोहित बसमध्ये चढला होता. पण या चाहत्यासाठी तो बसमधून खाली उतरला. त्याने चाहत्याने आणलेल्या जर्सीवर सही केली. विराट आणि रोहित दोघांनीही भारतीय संघाच्या जर्सीवर ऑटोग्राफ देत चाहत्याला खूश केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर ते आशिया कप २०२५ या संपूर्ण कालावधीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध ताणले गेले होते. आशिया कप २०२५ मध्ये हँडशेक करण्यावरुन हा वाद आणखी चिघळला गेला. आता विराट आणि रोहित यांनी पाकिस्तानी चाहत्याला भेट दिल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. विराट-रोहितने ऑटोग्राफ द्यायला नको होता असे काहीजणांनी म्हटले आहे, तर काहींनी दोघांची पाठराखण केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.