Court : कोर्टात सरकारी वकिलाला मारहाण! थेट चेंबरमध्ये घुसून बेदम मारलं, बूट फेकून मारला

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा न्यायालयामध्ये एका सरकारी वकिलाला मारहाण करण्यात आली. दुसऱ्या वकिलाने चेंबरमध्ये घुसून मारहाण केली. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे.
court
courtx
Published On
Summary
  • जिल्हा न्यायालयात सरकारी वकिलाला चेंबरमध्ये घुसून मारहाण केली.

  • एका वकिलाने दुसऱ्या सरकारी वकिलाला बेदम मारहाण केली.

  • या प्रकरणी वेदांत नगर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Court News : छत्रपती संभाजीनगर येथून मोठी बातमी समोर आली आहे. संभाजीनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एका सरकारी वकिलाला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना जिल्हा न्यायालयामध्ये संध्याकाळी साडेपाच ते सहा या दरम्यान घडली. या घटनेच्या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ए जी पी देशपांडे या सरकारी वकिलाला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या वकिलाने देशपांडे यांच्या चेंबरमध्ये घुसून त्यांना मारहाण केली. याशिवाय देशपांडेंना बूट देखील फेकून मारला. या घटनेची मोठी चर्चा परिसरात होत आहे.

court
Politics : युतीत फूट, भाजपला मोठा धक्का; NDA तील मित्रपक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार

सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या वकिलाने सरन्यायाधीशांच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती. या प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त केला गेला. या घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये लेखणी बंद निदर्शने आंदोलन ठेवण्यात आले होते.

court
बुधवार पेठेत धक्कादायक प्रकार, पतीने केला पत्नीचा खून; एक मुलगा, दोन मुली पोरकी

आंदोलन सुरु असताना वकिलांनी काम न करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान देशपांडे यांनी त्यांचे काम सुरु ठेवले. याशिवाय लोगो देखील लावला नाही. तेव्हा एडवोकेट महादेव लोखंडे यांनी ए जी पी देशपांडे यांना विचारणा केली. त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर लोखंडे यांनी देशपांडेंना मारहाण करत बूट फेकून मारला. या घटनेची दखल घेत वेदांत नगर पोलीस ठाण्यात कारवाई सुरु करण्यात आली आहे.

court
Pune : पुण्यात शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण, कानशिलात लगावल्याने कानाला दुखापत; शिक्षिकेवर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com