Tilak Varma : तिलक वर्माचं पाकिस्तानमध्येही तोंडभरून कौतुक, दिग्गजांनी काढली आपल्याच संघाची लाज, वाचा कोण काय म्हणाले?

IND Vs Pak Final : आशिया कप २०२५ मधील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. तिलक वर्माने सामन्यात उल्लेखनीय खेळी केली.
Tilak Varma
Tilak Varmax
Published On
Summary
  • आशिया कप २०२५ अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात करत ट्रॉफी जिंकली.

  • तिलक वर्माने संयमी खेळी करून भारताचा विजय निश्चित केला.

  • फक्त भारतातच नाही, तर पाकिस्तानमध्येही तिलक वर्माचे कौतुक होत आहे.

Asia Cup 2025 Final मध्ये भारताने पाकिस्तानवर ५ गडी राखत विजय मिळवला. १४७ धावांचे लक्ष्य गाठताना भारताचा संघ मैदानात उतरला होता. तेव्हा भारताचे ३ प्रमुख फलंदाज बाद झाले होते. त्यादरम्यान तिलक वर्माने संयमी खेळी केली. सुरुवातीला संजू सॅमसन आणि नंतर शिवम दुबे, रिंकू सिंह यांच्यासोबत तिलक शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला.

पाकिस्तानने १९.१ ओव्हर्समध्ये १४६ धावा केल्या होत्या. १४७ धावांचे आव्हान स्वीकारत अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली. पण दुसऱ्याच ओव्हरमध्ये अभिषेक बाद झाला. त्याच्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव, शुबमन गिलही माघारी परतले. संयम दाखवत तिलक वर्माने झुंजारु खेळी केली. भारतीय चाहते त्यांच्या या खेळीचे कौतुक करत आहेत. फक्त भारतच नाहीतर तिलक वर्माचे पाकिस्तानमध्येही कौतुक होत आहे.

Tilak Varma
Tilak Varma : तिलक वर्माचा मास्टरक्लास! सूर्याभाऊही झुकला, षटकार पाहून गंभीरने दिली भन्नाट Reaction; पाहा Video

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने एका कार्यक्रमात तिलक वर्माचे कौतुक केले. तो म्हणाला, 'ज्यांच्यावर ३० टक्के संघ अवलंबून आहे, असे भारताचे ३ फलंदाज बाद झाले, तरी तो टिकून खेळला. तिलक वर्माचा स्ट्राईक रेट सामना सोडला तर १६० च्यावर आहे. आज (२८ सप्टेंबर) तो १३० च्या स्ट्राईक रेटने खेळला का? १४७ धावा करायच्या आहेत हे त्याच्यासमोर लक्ष्य होते. परिस्थिती ओळखून त्यानुसार खेळ करणे हे दुसरे ध्येय त्याच्यासमोर होते. रनआउटची चूक सोडल्यास त्याने सामन्यात कोणती रिक्स घेतली? तुम्ही मला सांगा... खूप दिवसांनी इतका चांगला खेळ मी पाहिला. त्याने पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास काढून घेतला.'

फक्त शोएब मलिकच नाही, तर वसीम अकरम, शोएब अख्तर यांच्यासह पाकिस्तानच्या अनेक कॉमेंट्रीटर्स, दिग्गज खेळाडूंनीही तिलक वर्माचे, भारतीय संघाचे कौतुक केले. त्यांनी पाकिस्तानच्या संघाची इज्जत देखील काढली. 'याला म्हणतात मोठा खेळाडू! भारत का जिंकला? परिस्थितीनुसार कसे खेळावे? ओव्हरला ८-८.५ धावा हव्या असताना फलंदाजी कशी करावी? ते तिलक वर्माने दाखवून दिले. क्रिकेट कसे खेळावे? हे त्याने पाकिस्तानच्या संघाला, पाकिस्तानच्या प्रशिक्षकाला दाखवून दिले', असा एका पाकिस्तानी कार्यक्रमातील पत्रकाराने म्हटले.

Tilak Varma
IND Vs PAK Final : ए चल... भारताला चौथा धक्का बसला अन् अबरार अहमदनं पुन्हा केलं वादग्रस्त सेलिब्रेशन, Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com