Tilak Varma : तिलक वर्माचा मास्टरक्लास! सूर्याभाऊही झुकला, षटकार पाहून गंभीरने दिली भन्नाट Reaction; पाहा Video

Tilak Varma Asia Cup 2025 IND Vs Pak Final : भारताने पाकिस्तानचा पराभव करत आशिया कप २०२५ ची ट्रॉफी जिंकली. या सामन्यामध्ये तिलक वर्माने उल्लेखनीय कामगिरी केली.
Tilak Varma Asia Cup 2025 IND Vs Pak Final
Tilak Varma Asia Cup 2025 IND Vs Pak Final x
Published On

Team India Asia Cup 2025 Winner : भारताने पुन्हा एकदा आशिया कप जिंकला आहे. आशिया कप २०२५ च्या विजयाचे श्रेय तिलक वर्माला जाते. सामन्यामध्ये त्याने केलेल्या कामगिरीमुळे भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. ५३ चेंडूत तिलक वर्माने ६९ धावा केल्या. सामन्यात त्याने ४ षटकार आणि ३ चौकार मारले. त्याला संजू सॅमसन आणि शिवम दुबे या दोघांची चांगली साथ लाभली.

१४७ धावांचे लक्ष्य गाठत असताना अभिषेक शर्मा (५ धावा), शुबमन गिल (१२ धावा) आणि सूर्यकुमार यादव (१ धाव) अशा प्रकारे सलग ३ धक्के बसले. सूर्या बाद झाल्यानंतर तिलक वर्मा मैदानात आला. गिलची विकेट पडल्यावर संजू सॅमसन फलंदाजी करण्यासाठी आला. तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी संयमी पद्धतीने कामगिरी केली. पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला सामना त्यांनी भारताच्या बाजूने वळवला. संजू २४ धावांवर बाद झाल्यानंतर शिवम दुबेने तिलकला साथ दिली. त्याने २२ चेंडूत ३३ धावा केल्या.

तिलकचा षटकार आणि गंभीरची रिएक्शन

१८ व्या ओव्हरमध्ये मोठा शॉर्ट मारण्याच्या प्रयत्नात दुबे बाद झाला. त्याच्यानंतर रिंकू सिंह फलंदाजीला आला. शेवटच्या ओव्हरमध्ये हारिस रौफ गोलंदाजीला आला. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर तिलक वर्माने दोन धावा केल्या. दुसऱ्या चेंडूवर त्याने षटकार मारला. हा षटकार इतका दमदार होता, की ते पाहून गौतम गंभीरही खुश झाला. तिलकच्या षटकारावर गंभीरची रिएक्शन सोशल मीडिया व्हायरल होत आहे.

रनआउट होता-होता वाचला

संजू सॅमसन माघारी परतल्यानंतर शिवम दुबे फलंदाजीला आला होता. तेव्हा पुढे एका ओव्हरमध्ये धाव घेत असताना शिवम दुबेमुळे तिलक वर्मा रनआउट होणार होता. दोन धावा केल्यानंतर तिलक वर्माने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण दुबे धावला नसल्याने तिलकला मागे परतावे लागले. त्यावेळेस एका धावेपायी तिलक वर्माची विकेट पडणार होती. पण तो थोडक्यात वाचला.

सामन्यामध्ये तिलक वर्माने क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी केली होती. त्याने काही महत्त्वाचे झेल देखील घेतले होते. भारताचा विजय पक्का झाल्यानंतर तिलक वर्माने खास सेलिब्रेशन केले. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या त्याच्या खेळीची, हारिस रौफला मारलेल्या षटकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com