Asia Cup 2025

आशिया चषक स्पर्धा (Asia Cup 2025) सप्टेंबरमध्ये होणार आहे. ९ सप्टेंबरला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यावेळची आशिया चषक स्पर्धा टी २० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन गटात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. एका ग्रुपमध्ये चार संघ असतील. पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ असलेला भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतील. 'ग्रुप ए'मध्ये भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान हे चार संघ असतील. तर ग्रुप बीमध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ असणार आहेत. ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होईल. सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेसाठी यूएईमध्ये जाणार आहे.
Read More
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com