अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

abhishek sharma tops ICC t20 rankings with 931 points : भारताचा स्टार आणि स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा यानं आयसीसी टी २० रँकिंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अभिषेक टी २० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कप २०२५ स्पर्धेत त्यानं सर्वाधिक धावा केल्या होत्या.
Abhishek Sharma, Varun Chakravarthy, Tilak Varma
Abhishek Sharma, Varun Chakravarthy, Tilak Varmasaam tv
Published On

आशिया कप २०२५ स्पर्धेत धुवांधार फलंदाजी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांना फोडून काढणारा अभिषेक शर्मा आयसीसी टी २० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. तसंच आज, बुधवारी आयसीसीनं टी २० रँकिंग प्रसिद्ध केली. त्यात अभिषेकनं वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. टी २० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये इतिहासात सर्वाधिक गुणांसह अव्वल स्थान आणखी मजबूत केलं आहे. तर वरूण चक्रवर्ती यानं गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम ठेवलं आहे.

पाकिस्तानचा सईम अयूब यानं टी २० आंतरराष्ट्रीय ऑलराउंडरच्या यादीत भारताच्या हार्दिक पंड्याला मागे टाकलं आहे. अलीकडेच आशिया कप २०२५ स्पर्धा झाली. त्यात भारतानं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेत अभिषेक शर्मा यानं टी २० रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक ९३१ अंकांसह जवळपास पाच वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत काढला.

डेविड मलानचा विक्रम मोडला

आयसीसीनुसार, २५ वर्षीय अभिषेक शर्मा यानं २०२० मध्ये इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज डेविड मलान याच्या ९१९ गुणांचा विक्रम मोडला आहे. आशिया कप २०२५ स्पर्धेत २०० हून अधिकच्या स्ट्राइक रेटने ३०० हून अधिक धावा केल्या. अभिषेक शर्मा हा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला. त्याने सूर्यकुमार यादव (९१२ गुण) आणि विराट कोहली (९०९) यांनाही मागे टाकले आहे. गेल्या वर्षीच अभिषेकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आशिया कप २०२५ या स्पर्धेत सात सामन्यांत ४४.८५ च्या सरासरीने ३१४ धावा केल्या आहेत.

तिलक वर्माची झेप

अभिषेक शर्मानंतर दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा फिल सॉल्ट आहे. त्याच्यापेक्षा अभिषेकचे ८२ गुण अधिक आहेत. टीम इंडियामधील त्याचा सहकारी तिलक वर्मा यानं रँकिंगमध्ये झेप घेतली आहे. आयसीसी टी २० रँकिंगमध्ये तिलक वर्मा तिसऱ्या स्थानी आहे. आशिया कप स्पर्धेत त्याने २१३ धावा केल्या. श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज पथुम निसांका यानं या स्पर्धेत २६१ धावा केल्या. त्यामुळे त्याच्या रँकिंगमध्ये दोन स्थानांची सुधारणा झाली आहे. त्याने करिअरमधील सर्वोत्कृष्ट रँकिंग अर्थात पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.

निसांकाचा संघ सहकारी कुसाल परेरा याच्या रँकिंगमध्ये दोन स्थानांची सुधारणा होऊन तो नवव्या स्थानी, पाकिस्तानचा साहिबजादा फरहान याच्या रँकिंगमध्ये ११ स्थानांची सुधारणा होऊन तो १३ व्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा संजू सॅमसन याच्या रँकिंगमध्ये आठ स्थानांची सुधारणा होऊन तो ३१ व्या स्थानी पोहोचला आहे. आशिया कप स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळं या फलंदाजांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.

वरूण चक्रवर्ती १ नंबर गोलंदाज

आशिया कप स्पर्धेत वरुण चक्रवर्ती यानं सात विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो जगातील सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय गोलंदाज ठरला आहे. त्याचा सहकारी कुलदीप यादव याच्या रँकिंगमध्ये नऊ स्थानांची सुधारणा झालेली आहे. तो आता १२ व्या स्थानी आहे. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी १३ व्या स्थानी आहे. तर बांगलादेशचा फिरकीपटू रिषाद हुसैन २० व्या स्थानी आहे.

Abhishek Sharma, Varun Chakravarthy, Tilak Varma
Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

अयुबने पंड्याला मागे टाकून पहिल्यांदा ऑलराउंडरच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. अयुब हा फलंदाजीमध्ये पूर्णपणे ढेपाळला, मात्र गोलंदाजीत त्यानं प्रभावी कामगिरी केली. त्यानं आठ विकेट्स घेतल्या. त्यामुळे चार स्थानांची सुधारणा होऊन तो पहिल्या स्थानी पोहोचला. तर पंड्या हा दुसऱ्या स्थानी घसरला आहे. पाकिस्तानचा मोहम्मद नवाझ हा १३ व्या स्थानी, तर श्रीलंकेचा चरिथ असलंका हा ३० व्या स्थानी आहे.

Abhishek Sharma, Varun Chakravarthy, Tilak Varma
Abhishek Sharma Net Worth: महागड्या गाड्या, अलिशान घर; अभिषेक शर्माची एकूण संपत्ती किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com