
भारतीय संघातील युवा तारा वानखेडे स्टेडियमवर चांगलाच चमकला. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना मुंबईत पार पडला. या मैदानावर सचिन..सचिननंतर पहिल्यांदाचत अभिषेक..अभिषेक नावाचा गजर झाल्याचे पाहायला मिळाले.
पठ्ठ्याने सुरुवातीपासून ते सामना संपेपर्यंत प्रेक्षकांना जल्लोष करण्याची संधी दिली. एकट्टया अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांची धूलाई करत १३५ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी पाहून अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचं कौतुक केलं आहे.
अभिषेक शर्मा हा फार अनुभवी नाही. तो अवघ्या २४ वर्षांचा आहे. मात्र आतापासूनच त्याला भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार म्हटले जाऊ लागले आहे. १३५ धावा चोपून त्याने भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. अभिषेकच्या खेळीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ५४ चेंडूंचा सामना करत १३५ धावा चोपल्या.
या खेळीच्या बळावर भारताने २४७ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव ९७ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना १५० धावांनी आपल्या नावावर केला.
अभिषेक शर्माच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं, तर त्याची एकूण संपत्ती १२ कोटींच्या आसपास आहे. क्रिकेटसह तो जाहीरातीतूनही पैसा कमवतो. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी सनरायझर्स हैदराबादने त्याला १४ कोटी रुपये मोजत रिटेन केलं आहे. यासह भारतीय संघासाठी प्रत्येक सामना खेळण्यासाठी त्याला ३ लाख रुपये मिळतात. यासह त्याची आयपीएल स्पर्धेतील एकूण कमाई ही ३५ कोटींच्याही पुढे आहे.
एकूण सामने - १७
धावा- ५३५ धावा
शतक/अर्धशतक- २/२
अभिषेक शर्मा सध्या आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व करतोय. गेल्या हंगामात त्याने या संघाकडून खेळताना धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली.
या संधीचा फायदा घेत त्याने झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी केली होती. आता इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याने शानदार खेळी करत दुसरं शतक झळकावलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.