India vs Pakistan
India vs Pakistan x

IND vs PAK: भारत- पाकिस्तानी खेळाडूंचं सामन्यापूर्वीच हाय-फाईव्ह, पाकिस्तानसोबतची नो हँडशेक पॉलिसी इथेच संपणार?

Indian Players Shook Hands With Pakistani Players: मलेशिया येथील सामन्यादरम्यान भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हाय-फाईव्ह केले. सोशल मीडियावर या हाय-फाईव्हचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानसोबतचा नो हॅंडशेक पॉलिसी इथेच संपणार का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय.
Published on

मलेशियातील जोहार बहरु येथे सुलतान ऑफ जोहोर कप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत मंगळवारी भारतीय ज्युनियर हॉकी संघ आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. हा हायव्होलटेज सामना ३-३ ने ड्रॉ झाला. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हॅंडशेक न करता हाय-फाईव्ह केले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचा सामना खेळण्यास नकार दिला होता.

यानंतर, भारतीय क्रिकेट संघाने आशिया कपमध्ये पाकिस्तानी खेळाडूंशी हॅंडशेक करण्यास नकार दिला. महिला वर्ल्डकप २०२५ मध्येही भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानशी हॅंडशेक करण्यास नकार दिला होता. परंतु भारतीय ज्युनियर हॉकी संघाने पाकिस्तान संघाशी हाय फाईव्ह केल्यामुळे पाकिस्तानसोबत नो हँडशेक पॉलिसी इथेच संपणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

पाकिस्तानी फेडरेशनचा खेळाडूंना सल्ला

वृत्तानुसार,पाकिस्तान हॉकी फेडरेशन (PHF) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय संघाकडून हॅंडशेक न करण्याच्या धोरणासाठी खेळाडूंना मानसिकदृष्ट्या तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. ते म्हणाले की, खेळाडूंना सांगण्यात आले आहे जर भारतीय खेळाडू सामन्यापूर्वी किंवा नंतर हँडशेक करत नसतील तर त्यांच्या हावभावाकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जा. खेळादरम्यान कोणत्याही भावनिक प्रतिक्रिया टाळा.

पाकिस्तानसोबत नो हॅंडशेक विवाद

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकिस्तानशी हॅंडशेक करण्यास नकार दिला होता आणि संघाचा विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्यां कुटुंबियांना समर्पित केला होता.तसेच पाकिस्तानला आशिया कपच्या फायनलमध्ये हरवल्यानंतर भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर क्रिकेटविश्वात मोठा वाद निर्माण झाला होता.

India vs Pakistan
Harshit Rana: गौतम गंभीरला पुळका असलेला हर्षित राणा कोण? कसा आहे टीम इंडियापर्यंतचा प्रवास

भारताच्या आशिया कप विजयानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवला विचारण्यात आले की, पाकिस्तानसोबत हात न मिळवण्याचे धोरण भविष्यातील सामन्यांमध्येही सुरू राहील का? यावर सूर्यकुमार म्हणाला की, "पुढे काय होईल हे मला माहित नाही. दिल्ली अभी बहुत दूर है (दिल्ली अजूनही खूप दूर आहे). पुढच्या सामन्यात पाकिस्तानसोबत काय होईल हे मला माहित नाही. आम्ही फक्त बहु-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळतो, पण त्यावेळी काय होईल हे आम्ही तेव्हाचं तेव्हा पाहू. सध्या तरी, आम्हाला या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे.

India vs Pakistan
Smriti Mandhana: वर्ल्डकपमध्ये स्मृती मानधनाने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड, इतिहास रचला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com