IND vs PAK : महामुकाबला! भारत-पाकिस्तानमध्ये आज अटीतटीची लढत, कधी कुठे पाहाल सामना?

India vs Pakistan Asia Cup Rising Stars 2025 live streaming : आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. सामना कधी आणि कुठे पाहायचा जाणून घ्या.
India vs Pakistan Asia Cup
India vs Pakistan Asia CupSaam TV marathi News
Published On
Summary
  • आज दोहा येथे भारत अ आणि पाकिस्तान अ संघांचा महामुकाबला रंगणार.

  • १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा धडाकेबाज खेळ करेल अशी अपेक्षा.

  • भारतीय संघ आजही नो हँडशेक पॉलिसीचा अवलंब करू शकतो.

  • दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात दमदार विजयी कामगिरी केली आहे.

Asia Cup Rising Stars 2025 full squads India and Pakistan : क्रिकेटच्या मैदानात आज पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा आमना सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. भारतीय वेळेनुसार, आज रात्री आठ वाजता दोहाच्या मैदानात सामना रंगणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीकडे सर्वांच्या नजरा असतील. १४ वर्षाच्या वैभवने यूएईच्या विरोधात फक्त ३२ चेंडत शतक ठोकले होते.

जितेश शर्माच्या नेतृत्वातील भारतीय अ संघ आजच्या सामन्या नो हँडशेक पॉलिसीचे पालन करण्याची शक्यता आहे. आशिया चषक २०२५ दरम्यान सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने पाकिस्तानविरोधात हात मिळवला नव्हता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानविरोधात नो हँडशेकचा निर्णय घेतला. महिला विश्वचषकातही हरमनप्रीतच्या संघाने पाकिस्तानच्या संघाविरोधात हात मिळवले नव्हते. आता जितेश शर्माही त्याच नितीचे पालन करेल, असे बोलल जातेय.

India vs Pakistan Asia Cup
७०-८० नवे आता १५० वर्षे जगा, द्राक्षाच्या बिया वाढववणार तुमचं आयुष्य? वाचा शास्त्रज्ञांचा फॉर्म्युला

वैभवच्या फलंदाजीकडे सर्वांच्या नजरा -

पाकिस्तानविरोधात आज होणाऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करू शकतो . १४ वर्षांचा वैभव सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. यूएईविरोधात झालेल्या सामन्यात त्याने ३२ चेंडूत शतक झळकावले. युएईविरुद्धच्या त्या सामन्यात वैभवने ५२ चेंडूत १४४ धावा चोपल्या होत्या. यामध्ये १५ षटकार आणि ११ चौकारांचा समावेश होता. वैभवने याआधी आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी केली होती. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त ३५ चेंडूत शतक झळकावले होते.

India vs Pakistan Asia Cup
७५ लाख महिलांच्या खात्यावर ₹ १०,०००; रेवडी वाटपावर पवारांचा सवाल, फडणवीसांचे उत्तर, वाचा स्पेशल रिपोर्ट

पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये एकूण आठ संघ खेळत आहेत. भारत अ संघाचा समावेश ब गटात आहे. यूएई, ओमान आणि पाकिस्तानचा संघ आहे. अ गटामध्ये बांगलादेश, हाँगकाँग, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. भारत अ संघाने पहिल्या सामन्यात यूएईचा १४८ धावांनी पराभव केला. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने ओमानचा ४० धावांनी पराभव केला.

India vs Pakistan Asia Cup
Local Body Election : राजकीय कोलांटउड्या! ५ वर्षात पाचवा पक्ष, माजी आमदाराने सोडली शिंदेंची साथ, आता भाजपात दाखल

भारत अ संघ :

प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकीपर), रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, सुयश शर्मा, विजयकुमार, अब्दुल चरेल, युवराज चरेल

पाकिस्तान अ संघ :

यासिर खान, मोहम्मद नईम, मोहम्मद फैक, माझ सदाकत, गाझी घोरी (विकेटकीपर), इरफान खान (कर्णधार), साद मसूद, मुबासिर खान, उबेद शाह, अहमद दानियाल, मोहम्मद सलमान, खुर्रम शहजाद, मोहम्मद शहजाद, शाहिद अजीज, अराफत मुहम्मद, मुहम्मद मिन.

India vs Pakistan Asia Cup
Accident : सोनभद्रच्या खाणीत मोठी दुर्घटना, २ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली १५ जण गाडल्याची भीती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com