चीनच्या शास्त्रज्ञांनी वृद्धत्व कमी करणारे औषध विकसित केले.
PCC1 शरीरातील जंक सेल्स नष्ट करून नवीन पेशींना कार्यक्षम बनवतं
उंदरांवरच्या प्रयोगात आयुष्य सरासरी 9% वाढले आणि एकूण आर्युमान 64.2% ने जास्त टिकले.
या औषधामुळे 150 वर्षे जगण्याची शक्यता निर्माण झाली आहे
Can humans really live 150 years scientific explanation : तुम्ही आता 150 वर्षे जगू शकता... कारण शास्त्रज्ञांनी याचा फॉर्म्युला शोधून काढलाय. 150 वर्षे जगण्याचा नवा फॉर्म्युला नेमका काय आहे? द्राक्षे तुमचं आयुष्य कसं वाढवणार आहेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
शतायुषी भव असा आशिर्वाद आपण देत असतो तरी एखाद्या माणसचं आयुष्यमान किती असेल हे आजच्या काळात सांगणं तसं कठीण आहे.. . मात्र वयाची शंभरी गाठणारे काही मोजकेच लोक असतात.अशातच माणूस 100 नाही तर 150 वर्षे जगणार असल्याचं सांगितलं तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही.. मात्र हे शक्य आहे...ते कसं पाहूयात...
चीनमधील शास्त्रज्ञ शेन्झेन येथील लोन्वी बायोसायन्सेस लॅबमध्ये PCC1 हे आयुष्यमान वाढवणारं औषध तयार केलंय... PCC1 म्हणजे प्रोसायनिडिन C1, जे द्राक्षाच्या बियांमध्ये आढळणारं एक नैसर्गिक पॉलीफेनॉल कंपाऊंड आहे, त्याला सेनोलिटिक कंपाऊंड म्हणतात. PCC1 हे शरीरातील वृद्धत्व, अशक्तपणा आणि अनेक वयासंबंधित आजारांचं कारण ठरणाऱ्या 'जंक सेल्स' काढून टाकतं आणि नवीन पेशींना चांगलं कार्य करण्यास उत्तेजित करतं... उंदरांवर आणि काही टिश्यू मॉडेल्सवर सुरुवातीला शास्त्रज्ञांनी या औषधाचा प्रयोग केलाय...ज्यानंतर औषध घेतलेले उंदीर सरासरी 9 टक्के जास्त जगल्याचं आणि त्याचं आर्युमान 64.2 टक्के जास्त टिकल्याचं पाहायाला मिळालं...ज्यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढवण्यासाठी या औषधाचा फायदा होईल...
लोन्वी बायोसायन्सेस नावाची कंपनी सध्या चीनमध्ये या औषधाची निर्मिती करतयं...ही कंपनी आता या तंत्रज्ञानाचा वापर करून माणसासाठी अशी गोळी तयार करणार आहे.. ज्यामुळे निरोगी जीवनशैलीसह, 150 वर्षांपर्यंत जगणं शक्य होईल.मात्र या औषधाची मानवांवरची चाचणी अजून झालेली नाही... या चाचण्या करून प्रत्यक्ष वापरात हे औषध येण्यासाठी बराच वेळ लागणार आहे...तोपर्यंत मात्र योग्य आहार .योग्य व्यायाम करून तुम्ही आरोग्य उत्तम ठेवा...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.