NCERT Partition Module : भारत-पाकिस्तान फाळणीचं नवं मॉड्यूल; काँग्रेस जबाबदार, नेहरूंच्या भाषणाचाही दाखला

NCERT चं नवीन मॉड्यूल प्रसिद्ध केलेय. भारत-पाकिस्तान फाळणी आणि त्यामागील जबाबदार नेत्यांवर. फाळणीसाठी जिन्ना, काँग्रेस आणि माउंटबॅटन यांना जबाबदार ठरवण्यात आलं.
NCERT Partition Module 2025
NCERT Partition Module 2025
Published On
Summary
  • NCERT ने भारत-पाकिस्तान फाळणीवरील विशेष मॉड्यूल प्रसिद्ध केलं.

  • फाळणीसाठी जिन्ना, काँग्रेस आणि माउंटबॅटन यांना जबाबदार ठरवलं.

  • पं. नेहरूंच्या १९४७ च्या भाषणाचाही समावेश करण्यात आला.

  • काँग्रेसने नाराजी व्यक्त करत हे मॉड्यूल जाळण्याची मागणी केली.

NCERT Partition Module 2025: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटीने भारत-पाकिस्तान विभाजनावर एक नवीन मॉड्यूल जारी केले आहे. त्यामध्ये भारत-पाकिस्तानच्या फाळणीला जिन्ना, काँग्रेस अन् माउंटबेटनला जबाबदार असल्याचे म्हटलेय. यावर काँग्रेसकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. एनसीईआरटीने तयार केलेले हे नवीन मॉड्यूल नियमित अभ्यासक्रमाचा भाग नाही. अभ्यासक्रमाशिवाय अतिरिक्त माहितीसाठी दिल्या जाणाऱ्या मटेरियलचा हा भाग आहे. इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीसाठी वेगवेगळी मॉड्यूल्स तयार करण्यात आली आहेत. (New NCERT Partition Module Sparks Controversy, Congress Objects Strongly)

एनसीईआरटीने १४ ऑगस्ट रोजी हे विशेष मॉड्यूल प्रसिद्ध केलेय. फाळणीसाठी एक व्यक्ती जबाबदार नाही, तर तीन व्यक्तींना जबाबदार ठरवले आहे. यामध्ये जिन्ना, ज्यांनी विभाजनाची मागणी केली. काँग्रेस, ज्यांनी ती स्वीकारली, आणि माउंटबॅटन, ज्यांनी ती लागू केली, असे तीन जणांना भारत-पाकिस्तान फाळणीसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान फाळणीमुळे काश्मीर ही एक नवीन सुरक्षा समस्या तयार झाली. फाळणीचा उपयोग करून शेजारच्या देशाने भारतावर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव टाकण्यासाठी केलाय, असे मॉड्यूलमध्ये म्हटलेय. एनसीईआरटीच्या या विशेष मॉड्यूलवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी हे मॉड्यूल जाळण्याची मागणी केली आहे. कारण त्यांच्या मते यात सत्य सांगितले गेले नाही.

NCERT Partition Module 2025
Money Laundering Probe : ३,००० कोटींच्या प्रकरणात ईडीची धाड, मुंबईसह देशभरात १७ ठिकाणी छापे, ११० कोटी रुपये जप्त

या विशेष मॉड्यूलचे नाव फाळणीचे गुन्हेगार असे आहे. त्यामध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जुलै १९४७ रोजी केलेल्या भाषणाचाही समावेश करण्यात आला आहे. "आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत, जिथे आपल्याला एकतर फाळणी स्वीकारावी लागेल किंवा सतत संघर्ष आणि अराजकतेचा सामना करावा लागेल. फाळणी वाईट आहे, परंतु एकतेची किंमत कितीही असली तरी, गृहयुद्धाची किंमत त्याहूनही जास्त असेल, असे नेहरू यांनी भाषणात म्हटले होते."

NCERT Partition Module 2025
क्रिकेट विश्वावर शोककळा, ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचं निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com