ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व क्रिकेट लिजेंड बॉब सिम्पसन यांचे ८९ व्या वर्षी निधन.
सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
६२ कसोटी सामन्यांत ४८६९ धावा, ७१ विकेट्स आणि १० शतके त्यांच्या नावावर.
निवृत्तीनंतर कोच म्हणून कार्य, २०१३ मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश.
Bob Simpson Death News : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार बॉब सिम्पसन यांचे निधन झाले आहे. ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉब सिम्पसन यांनी ऑस्ट्रेलियाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बॉब सिम्पसन यांनी निवृत्तनंतर कोच म्हणून भूमिका बजावली. बॉब सिम्पसन यांना कमबॅकसाठी क्रिकेटविश्वात ओळखलं जाते. बॉब सिम्पसन यांनी वयाच्या ४१ व्या कमबॅक केले होते. बॉब सिम्पसन यांनी ६२ कसोटी २ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. (FORMER AUSTRALIA CAPTAIN AND CRICKET LEGEND BOB SIMPSON PASSES AWAY AT 89)
बॉब सिम्पसन यांनी १९५७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले होते. त्यांनी ४६.८१ च्या सरासरीने ४८६९ धावा केल्या. त्यामध्ये १० शतके आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात निवड झाली होती. फलंदाजीसोबत फिरकी गोलंदाज म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. कसोटीमध्ये बॉब यांनी ७१ विकेट घेतल्या आहेत. १९६८ मध्ये बॉब यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण १९७८ मध्ये वयाच्या ४१व्या वर्षी वर्ल्ड सीरिज क्रिकेटमध्ये त्यांनी कमबॅक केले अन् ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले.
उत्कृष्ट सलामीवीर फलंदाज, अप्रतिम क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फिरकी गोलंदाज म्हणून बॉब हे १९६० च्या दशकातील ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य आधारस्तंभ होते. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यू साउथ वेल्सचे कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून क्रिकेटमध्ये काम पाहिलेय. सिम्पसन यांनी १९९९ मध्ये इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सल्लागार म्हणून काम केले आणि २०१३ मध्ये त्यांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.