India Pakistan Ceasefire
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २००३ मध्ये शस्त्रसंधी झाली होती. पण पाकिस्तानकडून वारंवार याचं उल्लंघन करण्यात येत आहे. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी करार पहलगाम हल्ल्यानंतर मोडला गेलाय. सीमेवर गोळीबार, तोफांचा आणि ड्रोनद्वारे हल्ला केला जात आहे.भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांकडून सीमेवरून गोळीबार केला जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. भारताकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जातेय.