Raj Thackeray: अरे बाबांनो उठा! आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले! कोण जिंकलं आणि कोण हरलं? राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात नेमके काय? VIDEO

Raj Thackeray Cartoon On India Pakistan Match: राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही सामन्याचा उत्सव साजरा केल्याबद्दल त्यांनी “नक्की कोण जिंकलं? कोण हरलं?” असा सवाल उपस्थित केला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. यानंतर भारताने पाकिस्तानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार देखील बंद केले होते.मात्र नुकताच भारत दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला. या सामन्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधत धारेवर धरले होते. आता यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून सरकारवर टीकास्त्र सोडले.

व्यंगचित्रात काय?

राज ठाकरेनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात एकीकडे काश्मीरमधील सुंदर पहलगामचे सुंदर दृश्य दाखवण्यात आले तर दुसरीकडे एका बाजूला दहशतवाद्यांनी या ठिकाणी पर्यटकांना गोळ्या घालून त्यांचा जीव गेल्यानंतर पडलेला मृतदेहांचा खच दाखवण्यात आला. त्याच ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे पुत्र ICC चे अध्यक्ष जय शाह दिसत आहे. जय शाह एका मृतदेहाचा हात पकडून त्याला सांगत आहेत की, दुबईत आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. अरे बाबांनो उठा! आपण जिंकलो, पाकिस्तानी हरले! या सर्व घटनेकडे अमित शाह शांतपणे हाताची घडी घालून उभे राहून सर्व परिस्थिति पाहत आहे. या व्यंगचित्राला राज ठाकरेंनी याला एक कप्शन दिले आहे. नक्की कोण जिंकलं? आणि नक्की कोण हरलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com