अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट; जवानांच्या शक्तिप्रदर्शनाने देशभक्तीचा जल्लोष|VIDEO

BSF Parade At Attari Border With Tight Security: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा पार पडला. कडेकोट सुरक्षेत बीएसएफ जवानांनी शिस्तबद्ध संचलन करत भारताची ताकद आणि देशभक्तीचे दर्शन घडवले.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज अटारी बॉर्डरवर भारतीय जवानांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसला. या समारंभात सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि तालबद्ध संचलन सादर केलं. यामध्ये महिला अधिकारीही सहभागी झाल्या होत्या. तब्बल 20 हजारांहून अधिक नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले होते.

मात्र, यंदा सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान सीमेवरील दरवाजे बंदच ठेवण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुरक्षा यंत्रणांनी अधिक सतर्कता बाळगली असून पूर्वीप्रमाणे दरवाजे उघडणे किंवा मिठाईची देवाणघेवाण करण्यात आलेली नाही. सूर्यास्ताच्या वेळी अत्यंत सन्मानाने तिरंगा खाली उतरवण्यात आला आणि समारंभाची सांगता झाली. हा क्षण भारताची ताकद, शिस्त आणि संविधानिक मूल्यांप्रती असलेली निष्ठा दर्शवणारा ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com