Republic Day
Republic Day | २६ जानेवारी १९५० रोजी देशात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी भारतीय संविधान लागू करण्यात आलं. हा भारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक दिवस मानला जातो. संविधान लागू झाल्यानं नागरिकांचे हक्क, त्यांची कर्तव्ये सुनिश्चित झाली. देशाची राजधानी दिल्लीमध्ये भव्य दिव्य असे पथसंचलन केले जाते. ध्वजवंदनाच्या कार्यक्रमानंतर भारतीय सैन्यदलांचे संचलन होते. आपल्या देशाच्या संस्कृतीचं दर्शन या कर्तव्यपथावर होते. विविध राज्यांची संस्कृती चित्ररथांच्या माध्यमातून दाखवली जाते. देशभरात सरकारी कार्यालये, शाळा, सार्वजनिक ठिकाणी प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.