Maharashtra Live News Update: रायगडच्या पुनाडे घाटात पर्यटकांच्या वाहनाचा अपघात

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६, ७७ वा प्रजासत्ताक दिन, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यासह देश-विदेशातल्या महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

रायगडच्या पुनाडे घाटात पर्यटकांच्या वाहनाचा अपघात

किल्ले रायगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या मिनिबसला रायगड माणगाव रोडवरील पुनाडे घाटात अपघात झाला आहे. या अपघातात आठ प्रवाशी जखमी झालेत. मिनीबस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने माणगाव रायगड मार्गावरील पुनाडे येथील घाटाच्या अवघड वळणावर हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाड येथे उपचार सुरू आहेत.

रायगडमध्ये परतीच्या प्रवासात पर्यटकांचे मेगा हाल

० अलिबाग बस स्थानकावर पर्यटकांची तोबा गर्दी

० मुंबई पुण्याकडे जाण्यासाठी बसेस पुरेशा नसल्यानं प्रवाशांचा खोळंबा

०प्रवाशांच्या सेवेत एसटी बसेस अपुऱ्या

० सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी अलिबागमध्ये मोठ्या संख्येने आले होते पर्यटक

० जादा बसेस सोडूनही प्रवाशांची गर्दी हटेना

० रात्री उशिरा पर्यंत पर्यटकांची गर्दी कायम

पुण्यातील सिंहगड रोडवर वाहनावर झाड पडलं, रस्त्यावर झाली प्रचंड वाहतूक कोंडी 

पुण्यातील सिंहगड रोडवर असणाऱ्या नांदेड सिटी रोडवर मोठं झाड गाडीवर पडलं

कुठली जीवितहानी नाही, अचानक झाड पडल्याने वाहतूक कोंडी या रोडवर झाली होती

अग्निशामन दलाच्या वतीने झाड बाजूला करण्यात येत आहे.

आदिवासी बांधवांचे सर्व प्रश्न सोडवू; मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन 

- मंत्री गिरीश महाजन यांनी आदिवासी आंदोलकांना दिलं प्रश्न सोडवण्याच आश्वासन

- उद्या मुंबईतील बैठकीमध्ये आदिवासी बांधवांचे सर्व सोडवू, त्याची अंमलबजावणी केली जाईल

- तर आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च मात्र मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करतच राहणार

- ११ जणांचं शिष्टमंडळ उद्या सकाळी मुंबईला रवाना होणार

- दुपारी मंत्री मंडळ बैठकीनंतर आदिवासी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत होणार बैठक

ठाण्यात घंटाळी मैदान चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहिदांना श्रद्धांजली अर्पण

भारताच्या ७७ वा प्रजासत्ताक दिवस निमित्ताने ठाण्यातील घंटाळी मैदान चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहिदांना श्रद्धांजली अर्पण...

मनसे नेते अविनाश जाधव, मनसे नेते अभिजीत पानसे, ठाणे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीत शहिदांना श्रद्धांजली अर्पण...

वीर पत्नी रेखा रमेश जगताप यांचा ठाणे मनसेच्य वतीने सन्मान...

एक केस झाली म्हणून गप्प बसणारा नाही;  मंत्री भरत गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले यांच मोठ विधान

जामिन झाल्यानंतर सोमवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विरोधकांना समज देताना मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी मोठं विधान केलं आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, विकास गोगावलेच्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावलेचं रक्त आहे. कार्यकत्याच्या वाट्याला गेलल आपल्याला सहन होत नाही. न्याय देवतेने आदेश दिला म्हणून मी शरण गेलो, असं थेट विधान विकास गोगावले याने केलं आहे.

गणेश नाईक प्रकरणावरून महायुतीत वादाची ठिणगी; शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार 

गणेश नाईक प्रकरणावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिंदेंचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती हाती आली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये गणतंत्र दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर रस्त्यावर झाली सिनेस्टाईल मारामारी

धुळ्यात आंबेडकरी अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोला जोडे मारून त्यांच्या फोटोचे दहन केले

नाशिक येथे प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने महिला कर्मचारीने घेतलेल्या आक्षेपाचे पडसाद धुळ्यात उमटले

धुळ्यात आंबेडकरी अनुयायांनी पूर्णकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोर मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोला जोडे मारून त्यांच्या फोटोचे दहन केले आहे

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे

आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने हे निषेध आंदोलन धुळ्यात करण्यात आले आहे

पुण्यातील वन विभागासमोर जनशक्ती शेतकरी संघटनेचे आमरण उपोषण सुरू

सोलापूर वनपरिक्षेत्रात बोगस बांधकाम दाखवून जिल्हा योजनेतील निधी लाटलाचा गंभीर आरोप करत गणेश भानवसे यांनी वनविभाग भांबुर्डा पुणे या ठिकाणी आमरण उपोषणास पासून सुरू केला आहे.

खाजगी कंत्राटदाराला हाताशी पकडून बोगस पद्धतीचे बांधकाम दाखवून शासनाचा निधी अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गणेश नाईक यांच्या हस्ते बोईसर येथे स्वरोग्य होमिओपॅथिक रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला

जिल्ह्यातील समाजसेवक संजय पाटील यांची कन्या वैष्णवी पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी हे होमिओपॅथिक रुग्णालय सुरू केलं असून या रुग्णालयात एआयसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत . पालघरच्या ग्रामीण भागात हे पहिलंच इतका भव्य होमिओपॅथिक रुग्णालय असून या रुग्णालयात अत्यंत आधुनिक अशा यंत्राचा वापर केला जाणार आहे. सध्या पालघर जिल्ह्यात रुग्णालयांचा आणि विशेषतः होमिओपॅथिक रुग्णालयांचा अभाव असताना ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे .

शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच रायगडमधील राजकारणावर मोठ वक्तव्य

जिल्हा परिषद निवडणुकीच वातावरण रायगडमध्ये तापत असताना शेकापचा रायगड मधला मुख्यशत्रु शिंदेसेना असल्याच मोठ वक्तव्य शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी केल आहे. रायगडमध्ये शिंदे सेने समोर महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी उभी असताना शेकापने देखील शिंदे समोर दंड थोपटल्याचे संकेत चित्रलेखा पाटील यांनी दिले आहेत. हे शत्रुत्व नाही, विचारांची लढाई आहे पण शिंदे सेना विचित्र राजकारण करतय, पातळी सोडून राजकारण करत असल्याचा आरोप चित्रलेखा पाटील यांनी केला आहे.

किसान सभेच लाल वादळ ठाणे जिल्ह्याच्या वेशीवर धडकले!

गेल्या तीन दिवसांपासून दिंडोरी वरून निघालेला लाल वादळ आज ठाणे जिल्ह्याच्या वेशीवरती धडकला आहे.

चौथ्या दिवशी हा लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघणार आहे.

किसान सभेचे आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिंडोरी सह इतर जिल्हात सुरू होते.

शिवसेना नाही तुमची गद्दरांची गॅंग आहे... अंबादास दानवेंचा उदय सामंतांवर पलटवार

उदय सामंत यांनी अंबादास दानवे हे शिवसेनेत आमच्या सोबत असतील. ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत असं माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

त्यावर अंबादास दानवे म्हणाले, मी शिवसेनेत आहे. तुमची शिवसेना नाही. तर तुमची गद्दरांची गॅंग आहे.

नाशिक ते मुंबई आदिवासी शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचा आजचा दुसरा दिवस

नाशिक ते मुंबई आदिवासी शेतकऱ्यांच्या लाँग मार्चचा आजचा दुसरा दिवस

संपूर्ण मुंबई नाशिक महामार्ग हजारो आदिवासी आंदोलकांनी व्यापून गेला

मुंबई नाशिक महामार्गावर आदिवासी शेतकऱ्यांचं लाल वादळ

मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मार्गे मागे न फिरण्याचा आंदोलकांचा निर्धार

मुंबई - नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

आदिवासींच्या नाशिक ते मुंबई लाँग मार्चमुळे मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंढेगावजवळ महामार्गावर दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी

५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुण्यातील नीलसागर सोसायटीत गादी कारखान्याला भीषण आग

पुण्यातील नीलसागर सोसायटीत गादी कारखान्याला भीषण आग

आगीच्या घटनेत मोठे आर्थिक नुकसान

या भागात असलेल्या एका गादी बनविण्याच्या कारखान्याला अचानक आग लागल्याची घटना घडली

कल्याण पूर्वेत पोस्टर लावण्याच्या प्रकरणात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू

कल्याण पूर्वेत पोस्टर लावण्याच्या प्रकरणात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू

ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख रमेश टिके असे मयत पदाधिकाऱ्याचे नाव

काल कल्याण कोळशेवाडी परिसरात ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवकांचे पुस्तक लावल्याने टिके यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल होतील

मोहाडी तालुक्यात तरुणाची निर्घृण हत्या, २५ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह

मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे आज सकाळी एका २५ वर्षीय तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आकाश शेंडे असे मृत तरुणाचे नाव असून दीड महिन्यापूर्वी गावातीलच एका मुलीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. याच प्रकारातून ही हत्या झाल्याच्या संशय आता व्यक्त होत आहे, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाला पाठवला आहे आणि आता सखोल चौकशी पोलीस करत आहेत.

पुण्यातील नीलसागर सोसायटीत गादी कारखान्याला भीषण आग

पुण्यातील नीलसागर सोसायटीत गादी कारखान्याला भीषण आग, आगीच्या घटनेत मोठे आर्थिक नुकसान

या भागात असलेल्या एका गादी बनविण्याच्या कारखान्याला अचानक आग लागल्याची घटना घडली

आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण कारखाना आगीच्या विळख्यात सापडला

या आगीत कारखान्यातील गाद्या, कच्चा माल, यंत्रसामग्री जळून खाक झाली असून कारखानदाराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेले नाही

आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही

पुण्यातील मगरपट्टा भागात टोळक्याचा धुडगूस; मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

पुण्यातील मगरपट्टा भागात टोळक्याचा धुडगूस

७ ते ८ जणांच्या टोळक्याकडून शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

या टोळक्याने केवळ दहशत निर्माण केली नाही, तर दुकानाची तोडफोड देखील केली

ही घटना शनिवारी घडलेली आहे.

या गटाने लोकांना शिवीगाळ केली, त्यांच्यावर शारीरिक हल्ला केला आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या

त्यांनी एका दुकानाची तोडफोड केली, ज्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि स्थानिकांनी सार्वजनिक सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत घेणार महायुतीची जाहीर सभा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जाहीर सभा २८ जानेवारी ला कणकवलीत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होत असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर ही सभा होणार आहे. या जाहीर सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, निरंजन डावखरे यांच्यासहित महायुतीची प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

  • सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे कोकणात गेलेले पर्यटक माघारी फिरले

  • माणगावमध्ये मुंबई कडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

  • माणगाव पासून गारळ फाट्या दरम्यान वाहनांच्या रांगा

  • सुट्टी एन्जॉय करून परतीच्या प्रवासात असलेले पर्यटकांचे वाहतुक कोंडीत हाल

बीडमध्ये फेसबुक लाईव्ह करत तरुणाचा परळीच्या नगरपरिषदेच्या छतावरती जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न

बीडच्या परळी नगर परिषदेमध्ये 200 कोटीहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर यामध्ये एसआयटी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी आज प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने तरुणाने केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे उपोषण सुरू आहे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे या तरुणांनी थेट फेसबुक लाईव्ह करत नगरपरिषदेच्या छतावर चढत उडी मारण्याचा प्रयत्न करत आत्मदहनाचा टोकाचे पाऊल उचलला असून जिल्हा प्रशासनाची चांगलीच धांदल उडवली असून पोलीस अलर्ट मोड वरती होऊन नगर परिषदेकडे धाव घेतली असून मोठा जमावल्या ठिकाणी जमला आहे.

बुलढाण्यात झेंडावंदनाची तयारी करत असतानाच मुख्याध्यापकाचा धक्कादायक मृत्यू

देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह ओसंडून वाहत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ध्वजवंदनाची तयारी करत असतानाच मुख्याध्यापक दिलीप राठोड यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने शाळेच्या प्रांगणातच कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ध्वजवंदनाची तयारी सुरू असतानाच अचानक मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना चक्कर येऊन ते खाली कोसळले. उपस्थितानी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे मात्र उपस्थित गावकरी व विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण पश्चिमेकडील मच्छी मार्केटजवळच्या गाड्यांना आग

कल्याण पश्चिमेकडील मच्छी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस लाईन मधील जप्त केलेल्या गाड्यांना आग लागलीये...या आगीमुळे परिसरात धुराचे लोट दिसून येतायत....त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय...अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय

निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर होत असल्याच्या आरोपाचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून खंडन

निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर केला जातो असा विरोधकांचा आरोप होतो, पण ईश्वरपुरची नगरपरिषद तुम्ही जिंकलीच ना? आम्ही जिल्ह्यात जिंकलो पण ईश्वरपूर मध्ये हरलो हा आमचा मोठा पराभव आहे. सत्तेचा वापर केला असता तर सत्तेचे सर्व गैरप्रकार पहिला तिथे केले असते. सुप्रिया सुळे यांनी तर लोकसभेमध्ये त्या सतत निवडून येत असल्याचं मान्य केले. ईव्हीएम मध्ये गडबड असते तर मीही हरले असते असे सांगितले होते. ईव्हीएम मध्ये गडबड नसते मत चोरी नसते प्रत्येक जण आपापल्या मेरिटवर जायचं असतं. सत्तेचा गैरवापर होत असल्याच्या विरोधकांच्या टीकेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील वक्तव्याचा आधार देत निवडणुकात सत्तेचा गैरवापर होत असल्याच्या आरोपाचं खंडन केलं.

मुंब्रा कधी एक रंगावर अवलंबून राहिला नाही, सहर युनूस शेख यांनी आरोप करणार्‍यांना दिलं उत्तर

गेले अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेली मुंब्रा येथील नगरसेविकास सहर युनूस शेख यांनी तन्वर नगर या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा फडकवून आपल्या समाजकार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे, नेहमीच हिरव्या रंगावर वाद होत असताना तिने केलेल्या वक्तव्यानंतर राज्या आहे देशभरामध्ये दखल घेण्यात आली होते यासाठी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना देखील मुंब्र्यात येऊन त्यांची भेट घ्यावी लागली होती भविष्यामध्ये अशा प्रकारचा कुठल्या वक्तव्य तुझ्याकडून होणार नसलं तरी प्रभागातील काम केले जाणार आहे यासाठी तिचे वडील युनूसशेख यांनी तिने अशा प्रकारचे वक्तव्य भविष्यात करू नये असं सांगून ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे त्यांची सेवा करावी असे सल्ला देखील त्यांनी दिला आहे.... संविधानाच्या माध्यमातून जो काही हक्क आपल्याला दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला वागायला पाहिजे असा सहर युनूस शेख यांचे वडील यांनी सांगितलं आहे... मुंब्राचा कुठलाही एका रंगावरती अवलंबून नव्हतं तर ते तिरंगा वरती अवलंबून होतं

औसा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी आमदार दिनकर माने यांनी मुंबईत केला भाजपत प्रवेश

औसा विधानसभा मतदारसंघात भाजपाने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला , औसा विधानसभा चे माजी आमदार दिनकर माने यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे, दिनकर माने यांच्या या प्रवेशाने औसा विधानसभा मतदारसंघात भाजपाची मोठी ताकद वाढली जाणार आहे.

Raigad: रायगडात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण

रायगड जिल्ह्यात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलिस परेड मैदानावर मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला.यावेळी पोलिसांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर विविध पथकांचे संचलन पार पडले. मंत्री भरत गोगावले यांनी संचलनाची पाहणी केली. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

जळगावमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

जळगाव मध्ये 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या सह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी-कर्मचारी, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कर्तव्यपथावर शौर्यदर्शन! ३० चित्ररथांचं संचालन सुरु

आज कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यानंतर आता ३० चित्ररथांचे संचालन सुरु झाले आहे.

Sindhudurg: सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस परेड मैदानावर पोलीस दलाचे पथसंचलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. लोकशाही मजबुत करण्यासाठी पात्र मतदारांनी मतदान करावे. तसेच देशाची एकता टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Republic Day: शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते अमरावतीत ध्वजारोहण..

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावतीच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. दरम्यान दादा भुसे यांनी परेड निरीक्षण केले. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष जनार्दनपंत बोथे याना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला

Wardha: वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण

वर्धा येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानात प्रजासत्ताक ध्वजारोहण सोहळा

पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण

पालकमंत्री पंकज भोयर यांनी केले परेडचे निरीक्षण

जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती

Jalna: जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज जालना येथे पोलीस कवायत मैदानावर जालन्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडला. यावेळी जालना जिल्ह्यातील सर्व स्थानिक आमदार जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक यांच्यासह जिल्हा प्रशासनातले सर्व कर्मचारी उपस्थित होते...

Nandurbar: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा हस्ते नंदुरबार मध्ये ध्वजारोहण...

देशाचा 77 व्या प्रजाकसत्ता दिन मोठ्या उत्साहात साजरा...

राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.....

राज्य सरकारच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या जनकल्याण योजनेची माहिती देत जिल्हावासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात....

येणाऱ्या काळात गोरगरीब वंचित पीडित लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येणार असून पोलीस दल देखील सर्वसामान्य जनतेच्या बरोबरीने उभी राहणार.....

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर अजित पवार कोट्यातील या नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना ध्वजारोहणाचा मान...

Raigad: मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन

मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते रायगडच्या मुख्यालयी झेंडा वंदान

अलिबाग येथील पोलिस परेड ग्राऊंडवर झाले ध्वजवंदन

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ध्वजवंदन

भारताच्या ७७ वा प्रजासत्ताक दिवस निमित्ताने ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात उपमुख्यमंत्री, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात झेंडावंदवासाठी उपस्थित

ठाणे जिल्हाधिकारी श्री कृष्णा पांचाळ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती..

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजप आ. संजय केळकर माजी आ.रविंद्र फाटक यांची उपस्थिती..

शासकीय ध्वजारोहण, दरम्यान पोलिस करणार पथसंचलन

शासकीय कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन केला जाणार आहे सत्कार....

Pune: पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण 

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण

पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पथसंचलन

पुणे पोलिस अंतर्गत येणाऱ्या विविध दलाचे पथसंचलन

परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी तुळजापूर बस स्थानकाची पाहणी

राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर मधील व स्थानकाला अचानक भेट देत व स्थानक परिसर व स्वच्छतागृहाची पाहणी केली.सरनाईक यांनी केलेल्या पाहणी दरम्यान बस स्थानकात अस्वच्छता दिसल्याने पालकमंत्री प्रताप सरनाईक हे चांगले संतापले होते.तुळजापूरचे बस स्थानक हे महत्त्वाचे असून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारा भावी याच बस स्थानकावर येतो म्हणून इथली अस्वच्छता खपवून घेणार नसल्याचे सांगत प्रताप सरनाईक यांनी या ठेकेदाराला नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत.

Pune: गट नेते पदासाठी भाजपची पुण्यात बैठक

महापौर निवड, गट नेते पदासाठी भाजपची पुण्यात बैठक

27 जानेवारी रोजी पुण्यात भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक

पुणे महानगरपालिकेत गटनेता ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक

27 तारखेला भाजपच्या बैठकीत ठरवण्यात येणार भारतीय जनता पक्षाचा गटनेता

पुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजपची सर्व नगरसेवकांसोबत 27 तारखेला पुण्यात बैठक

याच दिवशी भाजपचा पुणे महानगरपालिकेत गटनेता ठरवण्यात येणार

पुण्यात भाजपच्या 119 नगरसेवकांचा विजय

निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांसोबत स्थानिक नेते घेणार बैठक

6 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत बसणार भाजपचा महापौर

Amravati: अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई; १ लाख ६२हजाराचा अवैध गांजा जप्त

अमरावती शहरात अवैध अंमली पदार्थ विक्रीविरोधात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.नागपूर–अमरावती एक्सप्रेस हायवे लगत वडाळी सर्व्हिस रोड परिसरात सापळा रचून एका तरुणास ताब्यात घेण्यात आले.

अटक आरोपीकडून ८ किलो १०५ ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ₹१,६२,१००) तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा एकूण ₹१,७२,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Bankok:  बँकॉकमध्ये बारामतीच्या यश देवकरचा सुवर्णविजय

बँकॉक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बारामतीचा पैलवान यश सुरेश देवकर याने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यशने आपल्या आक्रमक आणि दमदार पवित्राचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्याला थेट 0–10 अशा फरकाने पराभूत केले. या दणदणीत विजयासह त्याने भारताच्या संघासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकून देशाचे वर्चस्व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित केले.

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच यशने आक्रमक कुस्त्यांची मालिका सुरू ठेवत प्रत्येक लढतीत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला गेला. या यशामुळे यशने केवळ देशाचेच नव्हे, तर आपल्या आई-वडिलांचे आणि बारामतीचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल यश देवकरचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Republic Day 2026: दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ध्वजारोहण, कर्तव्यपथावर दीड तास परेड चालणार

दिल्लीत राष्ट्रपतीच्या हस्ते होणार ध्वजारोहण

विजय चौक ते लाल किल्ला अशी असणार परेड

कर्तव्यपथावरची परेड दीड तास चालणार

Pandharpur: विठ्ठल मंदिरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आज देशभरात 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे विठुरायालाही तिरंग्याचे उपरण परिधान करण्यात आले आहे. पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली आहे . या सजावटीसाठी गुलाब, आस्टर झेंडू ,मोगरा ,जरबेरा ,ऑर्किड अशा विविध फुलांनी मंदिर सजवले आहे. यासाठी सुमारे दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.

BCCI चे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचे निधन

BCCI चे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचे निधन झाले आहे.वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होती. आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली.

Hingoli: ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ परिसरात ट्रॅक्टर अपघात; वाहतूक खोळंबली

हिंगोलीच्या औंढा नागनाथ परिसरात उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ओव्हरलोडींग मुळे भीषण अपघात झाल्याने परभणी औंढा राज्यमार्गावर मोठी वाहतूक खोळंबली आहे, एसटी महामंडळाच्या बसेस देखील या अपघातामुळे रस्त्यावर अडकून पडल्या होत्या तर औंढा नागनाथ कडे दर्शनासाठी येणारे भाविक एक ते दीड तास रस्त्यावर ताटकळत थांबले होते, सध्या शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी सुरू आहे आणि हा ऊस ट्रॅक्टर मध्ये भरून कारखान्याकडे घेऊन जाण्यासाठी वाहतूक सुरू आहे मात्र ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्या जात असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे दरम्यान याकडे आरटीओ विभागासह वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिक करत आहेत.

26th January: प्रजासत्ताकदिना निमित्ताने नंदुरबार रेल्वे स्थानकाला आकर्षक विद्युत रोषणाई...

राज्यासह देशात प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह पाहण्यास मिळत आहे नंदुरबार रेल्वे स्थानकाला प्रजासत्ताकदिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईच्या माध्यमातून तिरंग्याची प्रतिकृती पाहण्यास मिळत आहे. रेल्वे स्थानक परिसरात तिरंगी रोषणाई मनमोहक दिसत असल्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांसह शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठाणे, कल्याण मध्ये कार्यकर्त्यांची शिवसेनेबरोबर युती झाल्यामुळे परवड-गणेश नाईक

ठाणे, कल्याण मध्ये कार्यकर्त्यांची शिवसेने बरोबर युती झाल्यामुळे परवड झाली अशी खंत भाजपाचे नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. युती झाल्यामुळें वनमंत्री गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.भाजप ला जर खुली दिली असती तर भाजपाचा सर्व ठिकाणी महापौर सगळीकडे बसला अशी भावना व्यक्त करून ठाण्यात येऊन सेनेला नाईक यांनी डिवचले आहे. भाजपाने परवानगी दिली तर यांचा नामोनिशाण संपवेन असे आवाहन देखील गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन दिले आहे.

Nagpur: नागपूर महापालिकेतील नगरसेवकांची २७ जानेवारीला गटनोंंदणी होणार

नागपूर महापालिकेतील भाजपच्या १०२ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी मंगळवारला होणार, २७ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे होण्याची शक्यता.

गटनोंदणीसोबतच महापालिकेतील सत्तापक्ष नेत्याचे नाव निश्चित होणार.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे सभागृहातील महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागणार यासाठी एक मताने निर्णय घेणार.

महापौर, सत्तापक्षनेता, स्थायी समिती अध्यक्ष आणि परिवहन सभापती ही पदे महत्त्वाची.

महापौरपद फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार; त्याआधी सत्तापक्ष नेत्याची निवड अपेक्षित.

सत्तापक्ष नेत्यावर सभागृह संचालन आणि नगरसेवकांचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी.

महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव. उपमहापौरपदावर पुरुष नगरसेवकाची शक्यता.

Pune: प्रोजेक्ट ‘महादेवा’साठी पुण्याच्या करण भुतकरची निवड

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ, पुणे येथे शिक्षण घेत असलेला फुटबॉलपटू करण नितिन भुतकर याची महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प महादेवा या ग्रासरूट्स फुटबॉल विकास योजनेसाठी निवड

टायगर्स कंबाईन या क्लबमध्ये त्याने वडील नितिन भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉलचे धडे गिरवले आहेत.

सध्या तो स्पोर्ट्स मेनिया क्लबमध्ये सराव करत आहे

प्रोजेक्ट महादेवा हा उपक्रम महाराष्ट्र सरकारच्या वतीने एमआयटीआरए, सिडको आणि वेस्टर्न इंडिया फूटबॉल असोशिएशन (डब्ल्यूआयएफए) यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे

१४ वर्षांखालील मुलांमधील फुटबॉल कौशल्य शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.

या प्रकल्पांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून ३० मुले व ३० मुली यांची निवड करण्यात आली आहे

निवड झालेल्या खेळाडूंना ५ वर्षांची पूर्ण शिष्यवृत्ती दिली जाणार

खालापूर मधील सावरोली जिल्हा परिषद निवडणुकीतून उबाठाचे उमेदवार उत्तम भोईर यांची माघार

रायगडच्या खालापूर तालुक्यातील सावरोली जिल्हा परिषद मतदार संघातून परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष बैलमारे यांची ताकद वाढली असून नाराज असलेले सुरेश पाटील यांची सुनील तटकरे यांनी नाराजगी दूर केलीय. तर दुसरीकडे याच मतदार संघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभे असलेले उमेदवार उत्तम भोईर यांनी देखील माघार घेत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार संतोष बैलमारे यांना बिनशर्त पाठिंबा दर्शविलाय.त्यामुळे युती झालेल्या ठाकरे सेना आणि अजित

Delhi: प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी एकूण ३० चित्ररथ कर्तव्य पथावर निघतील

दिल्ली -

प्रजासत्ताक दिनानिमित्त यावर्षी एकूण ३० चित्ररथ कर्तव्य पथावर निघतील

यापैकी १७ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या आणि १३ मंत्रालयांच्या असतील

Delhi: कर्तव्य पथकावर भारतीय लष्कराची ताकद पाहायला मिळणार

प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडिया गेटजवळील कर्तव्य पथावर एका शानदार परेडचे आयोजन केले जाते

यावेळी वंदे मारतम च्या १५० व्या वर्धापन दिनाचे औचित्या साधले जाणार आहे

कर्तव्य पथकावर भारतीय लष्कराची ताकद पाहायला मिळेल

यावेळी वंदे मारतमचे महत्व अधोरिखित केले जाईल

Delhi: आज ७७ वा प्रजासत्ताक दिन 

आज ७७ वा प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी १९५० रोजी भारताने संविधान स्वीकारले

याच दिवशी संविधान भारतात लागू करण्यात आले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com