Shocking: मुंबईत स्पीकर अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं; थरारक VIDEO समोर

Mumbai Child Death Speaker Collapse: मुंबईमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भयंकर घटना घडली. अंगावर स्पीकर पडून ३ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
Shocking: मुंबईत स्पीकर अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं; थरारक VIDEO समोर
Mumbai Child Death Speaker CollapseSaam Tv
Published On

Summary -

  • विक्रोळी टागोरनगरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठी दुर्घटना

  • स्पीकर अंगावर पडून ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

  • संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला

मयूर राणे, मुंबई

मुंबईत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घटना घडली. कार्यक्रमासाठी लावण्यात आलेला स्पीकर अंगावर पडून एका ३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही मन सुन्न करणारी घटना विक्रोळीतील टागोरनगर भागात घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेमुळे विक्रोळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी टागोरनगरच्या आंबेडकर नगरमध्ये ही भयंकर घटना घडली. प्रजासत्ताक दिनानिमित्त याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमासाठी रस्त्याच्या कडेला दोन स्पीकर लावण्यात आले होते. संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण होते. रस्त्यावर लहान मुलं देखील खेळत होती. याच दरम्यान घराबाहेर खेळत असलेली मुलगी पळत जात असताना अचानक तिच्या अंगावर स्पीकर पडतो आणि तिचा मृत्यू होतो.

चिंधीवाल्याच्या चुकीमुळे स्पीकर कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्पीकर अंगावर पडून ३ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या प्रकरणी विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Shocking: मुंबईत स्पीकर अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं; थरारक VIDEO समोर
Shocking : शीर धडावेगळं केलं, मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत भरला; कर्मचाऱ्याने HR ला क्रूरपणे संपवलं

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती त्या स्पीकरच्या जवळ जातो. स्टँडवर लावलेल्या स्पीकरला किंवा त्याच्या वायरला धक्का लागतो आणि तो स्पीकर खाली पडतो. त्याचवेळी त्याठिकाणावरून चिमुकली पळत जात असते. त्या चिमुकलीच्या अंगावर स्पीकर पडतो. या मुलीच्या काकांचा मुलगा तिला पटकन उचलून घेतो आणि रुग्णालयात घेऊन जातो. पण तोपर्यंत उशिर होता. या मुलीचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.

Shocking: मुंबईत स्पीकर अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं; थरारक VIDEO समोर
Shocking! वजन कमी करण्याचा प्रयोग ठरला जीवघेणा; यूट्यूबवर पाहिलेल्या औषधामुळे 19 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com