Crime : हल्ली सगळ्यांना बारीक दिसायचे असते कोणाला थोडेसेही वजन नको असते. लठ्ठपणामुळे लोकांना फक्त लाज वाटतेच नाही तर आजारही वाढतात. परिणामी, बरेच लोक वजन कमी कसे करावे यासाठी टिप्ससाठी यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपाय शोधतात. बहुतेक जण डॉक्टरांची फी वाचवावी आणि शॉर्टकट वापरून वजन कमी करावे यासाठी काही विचित्र उपया करतात. परंतु कधीकधी हे उपाय महागात पडू शकते. तमिळनाडूतील मदुराई येथे असेच घडले. एका मुलीने YouTube वर वजन कमी करण्याची रेसिपी शिकली, परंतु काही तासांतच या रेसिपीमुळे तिला तिचा जीव गमवावा लागला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मदुराईतील मीनंबलपुरम येथील रहिवासी कलैयारासी (१९) तिच्या वाढत्या वजनाबद्दल चिंतेत होती. तिने YouTube वर एक व्हिडिओ पाहिला यामध्ये बोरॅक्स (सोडियम बोरेट) खाल्ल्याने वजन जलद कमी होऊ शकते असा दावा करण्यात आला होता. व्हिडिओपासून प्रेरित होऊन, कलैयारासीने १६ जानेवारी रोजी एका दुकानातून हे बोरॅक्स खरेदी केले आणि १७ जानेवारी रोजी सकाळी ते सेवन केले.
उलट्या झाल्या, अवयव निकामी होऊ लागले
बोरॅक्स खाल्ल्यानंतर काही वेळातच तिला उलट्या होऊ लागल्या आणि मळमळ सुरु झाली . तिच्या कुटुंबीयांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेले, जिथे तिला प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. पण, संध्याकाळपर्यंत तिची प्रकृती अधिकच बिकट झाली. अशक्तपणा आणि सतत उलट्या होत असल्याने तिला रात्री ११ वाजता सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कलैयारासीच्या वडिलांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे आणि सध्या "संशयास्पद मृत्यू" चा तपास सुरू आहे.
बोरॅक्स किती धोकादायक आहे?
तज्ञांचा असा विश्वास आहे की बोरॅक्स, ज्याला सोडियम टेट्राबोरेट असेही म्हणतात, घरातील स्वच्छता, कपडे धुण्याचे डिटर्जंट आणि कीटकनाशकांमध्ये वापरले जाते. हे मानवी शरीरासाठी विष म्हणून काम करते. ते खाल्ल्याने मूत्रपिंड निकामी होऊ शकते. अंतर्गत अवयव जळू शकतात आणि रासायनिक विषबाधा होऊ शकते. यामुळे अनेकदा थेट मृत्यू होतो. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये अन्नात त्याचा वापर पूर्णपणे बंदी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.