Marathi Reel star Death: माय-लेकाची सुंदर जोडी तुटली...; मराठमोळ्या रिल स्टारचं अचानक निधन, चाहत्यांना मोठा धक्का

Marathi Reel star Death: सोशल मिडीयावर मराठी रील व्हिडिओ आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध असलेला रिल स्टार प्रथमेश कदमचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे.
Marathi reel star Prathamesh Kadam unawares  passes away
Marathi reel star Prathamesh Kadam unawares passes away Saam Tv
Published On

Marathi Reel star Death: सोशल मिडीयावर मराठी रील व्हिडिओ आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध असलेला रिल स्टार प्रथमेश कदमचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. चाहत्यांना आणि इंडस्ट्रीतील त्याच्या मित्र-मैत्रिणींना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. प्रथमेश त्याच्या आईसोबतच्या मजेदार रील्समुळे मराठी डिजिटल विश्वात लोकप्रिय झाला होता. त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

सोशल मिडीयावर त्याच्या फॉलोअर्सने शोक व्यक्त करताना #RIPPrathameshKadam हा हॅशटॅग व्हायरल केला आहे. त्याच्या अचानक जाण्यामुळे चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे आणि सोशल मिडियावर त्याच्या आठवणी, व्हिडिओजना उजाळा मिळत आहे.

Marathi reel star Prathamesh Kadam unawares  passes away
Diljit Dosanjh: 'बॉर्डर २'चं सक्सेस बघून भावुक झाला दिलजीत दोसांझ, म्हणाला- मला कधीच माहित नव्हतं...

प्रथमेश कदम खासकरून माय-लेकाच्या जोडीतील रील व्हिडिओंमुळे अत्यंत चर्चेत होता आणि त्यांच्या मजेशीर, सहज आणि आकर्षक अंदाजामुळे ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी मिळवू शकले होते. प्रथमेशचा सोशल मीडियावर मोठा फॉलोइंग होता. त्यांच्या रिल्सने फक्त मनोरंजनच नव्हे तर अनेकांना प्रेरणा देखील दिली.

Marathi reel star Prathamesh Kadam unawares  passes away
Actor Arrested: 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोप

प्रथमेश डिसेंबर 2025 मध्ये, एक व्हिडीओ पोस्ट केला. त्याने सांगितलं की, त्याची फसवणूक झाली आहे. त्यानंतर, तो काही काळ आजारी होता त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याने हॉस्पिटलमधूनही व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचे मनोरंजन केले होते.

प्रथमेशचे निधन नेमके कशामुळे किंवा कधी झाले याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. परंतु त्याच्या निधनाने चाहत्यांचे आणि डिजिटल विश्वाचे हे नुकसान मोठे आहे. प्रथमेशचा मित्र तन्मय पाटेकरने इन्स्टाग्रामवर त्याच्या फोटोसह, ''तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश, देवाघरी स्वतःची काळजी घे रे ! खूप आठवण येईल तुझी Miss You Bhai' असे कॅप्शन देऊन त्याला श्रद्धांजली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com