Border 2 Collection : पैसाच पैसा; प्रजासत्ताक दिनाला 'बॉर्डर 2' ची बक्कळ कमाई, 'पुष्पा', 'जवान', 'टाइगर'लाही पछाडलं- बनवला जबरदस्त रेकॉर्ड

Border 2 Worldwide Collection : सनी देओलच्या 'बॉर्डर 2' चित्रपटाने चार दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रजासत्ताक दिनाला किती कमावले, जाणून घेऊयात.
Border 2 Worldwide Collection
Border 2 Collectionsaam tv
Published On
Summary

'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला रिलीज झाला आहे.

'बॉर्डर 2'ने जगभरात 200 कोटी रुपयांच्यावर कमाई केली आहे.

प्रजासत्ताक दिनाला 'बॉर्डर 2' ने सर्वात जास्त कलेक्शन केले.

सध्या सर्वत्र फक्त 'बॉर्डर 2' चा बोलबाला पाहायला मिळत आहे. 26 जानेवारीला (प्रजासत्ताक दिन) चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. सनी देओल 'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंह हे आहेत. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, परमवीर सिंह चीमा, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मेधा राणा आणि मोना सिंग झळकले आहेत. 'बॉर्डर 2' हा 1997 ला रिलीज झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे.

'बॉर्डर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'बॉर्डर 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 30 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 35 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 54.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटाने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला बक्कळ कलेक्शन केले आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार,'बॉर्डर 2' ने चौथ्या दिवशी 59 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 180 कोटी रुपये झाले. मीडिया रिपोर्टनुसार, 'बॉर्डर 2'ने जगभरात 200 कोटींच्यावर कमाई केली आहे. चार दिवसांत 239.2 कोटी रुपये कमावले आहेत.

  • पहिला दिवस - 30 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 36.5 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 54.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 59 कोटी रुपये

  • एकूण - 180 कोटी रुपये

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

मीडिया रिपोर्टनुसार, 'बॉर्डर 2' चित्रपट पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'बॉर्डर 2'ने रिलीजच्या पहिल्या सोमवारी विक्रमी कमाई करून इतिहास रचला. त्याने 'पुष्पा 2', 'छावा', 'धुरंधर', 'पठाण' आणि 'जवान' यांसारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

  • बॉर्डर 2- 59 कोटी रुपये

  • टाइगर 3- 58 कोटी रुपये

  • पुष्पा 2- 46.4 कोटी रुपये

  • बाहुबली 2- 40.25 कोटी रुपये

  • एनिमल- 40.06 कोटी रुपये

  • गदर 2- 38.7 कोटी रुपये

  • स्त्री 2- 38.1 कोटी रुपये

  • टाइगर जिंदा है-36.54 कोटी रुपये

  • हाउसफुल 4- 34.56 कोटी रुपये

  • कृष 3-33.41 कोटी रुपये

  • जवान- 30.5 कोटी रुपये

Border 2 Worldwide Collection
Famous Actress : मौनी रॉयनंतर आणखी एका अभिनेत्रीसोबत Live शोमध्ये गैरवर्तन; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com