Shreya Maskar
'बॉर्डर 2' चित्रपट 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज करण्यात आला आहे. सनी देओल 'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 पासून पाहायला मिळत आहे.
'बॉर्डर 2' चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, परमवीर सिंह चीमा, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मेधा राणा आणि मोना सिंग झळकले आहेत.
'बॉर्डर 2' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंह हे आहेत. 'बॉर्डर 2' हा 1997 ला रिलीज झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे. जवळपास 26 वर्षांनंतर 'बॉर्डर २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'बॉर्डर 2' चित्रपटाची कथा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त ऑपरेशन्सचे चित्रण केले आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार,'बॉर्डर 2' ने तिसऱ्या दिवशी 54.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 121 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
'बॉर्डर 2' चित्रपट थिएटर गाजवल्यानंतर ऑनलाइन पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बॉर्डर 2' चित्रपट नेटफ्लिक्सवर या 'ओटीटी' प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.
'बॉर्डर 2' चे ओटीटी स्ट्रीमिंग राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. प्रेक्षक 'बॉर्डर 2' ओटीटीवर येण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'बॉर्डर 2' हा वरुण धवनचा चित्रपट मार्च किंवा एप्रिल 2026 मध्ये ओटीटीवर पाहायला मिळू शकतो. मात्र अद्याप अधिकृतरित्या रिलीज डेट जाहीर झाली नाही.