Shreya Maskar
शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' चित्रपट 13 फेब्रुवारी 2026ला रिलीज होणार आहे. म्हणजे येणारा 'व्हॅलेंटाईन डे' खूप खास असणार आहे. 'ओ रोमियो' चे निर्माते विशाल भारद्वाज आहेत. चित्रपट अॅक्शन-थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट आहे.
'ओ रोमियो'मध्ये शाहिद कपूरसोब तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच चित्रटात खूप तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. यात दिग्गज अभिनेते नाना पाटेकर , रणदीप हुडा , दिशा पटानी यांचा समावेश आहे.
'ओ रोमिओ' चित्रपटात सर्वाधिक मानधन अभिनेता शाहिद कपूर याने घेतले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याला 45 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.
चित्रपटाची नायिका तृप्ती डिमरीला देखील तगडे मानधन मिळाले आहे. तृप्तीने एकूण 6 कोटी रुपये फी घेतली आहे.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर देखील या रोमँटिक, ॲक्शन, थ्रिलर चित्रपटाचा भाग आहेत. त्यांना चित्रपटासाठी 4 कोटी रुपये मिळाले आहेत.
दिशा पटानीला आपल्या चित्रपटातील भूमिकेसाठी 2 कोटी रुपये मिळाले आहे. ती आपल्या ग्लॅमरस अंदाजने चित्रपटाला चारचाँद लावेल.
'ओ रोमिओ' चित्रपटात अविनाश तिवारी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याला चित्रपटासाठी तब्बल 7 कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे.
आपल्या डान्सने कायम प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाला 'ओ रोमिओ' चित्रपटासाठी तब्बल 7 कोटी फी मिळाली आहे.