Shreya Maskar
अमृता खानविलकरने मराठीसोबत, हिंदी इंडस्ट्री देखील गाजवली आहे. तिने अनेक मराठी, हिंदी कार्यक्रम, रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमृताने सोशल मिडीयावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अमृता खानविलकरने सुंदर लिंबू कलर वेस्टन ड्रेस परिधान केला आहे. यावर फ्लोअर प्रिंट पाहायला मिळत आहे.
मिनिमल मेकअप, मोकळे केस, शूज, गोल्डन ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे. तिच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अमृताने या फोटोंमध्ये प्रिंटेड शॉर्ट वन पीस परिधान केला आहे. मोकळे केस, उंच हिल्स आणि मोठे कानातले घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
अमृताने वेस्टन ब्लू आऊटफिट परिधान केला आहे. ज्यात फ्लोअर प्रिंट असलेला निळ्या रंगाचा स्कर्ट, त्यावर स्टायलिश व्हाइट-ब्लू शर्ट तिने परिधान केले आहे.
हाय पोनीटेल, ऑक्सीडाइज्ड ज्वेलरी आणि ग्लॉसी मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे. अमृताचा हा लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.
अमृता खानविलकरच्या सर्वच फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहे. अमृता खानविलकर कायमच प्रेक्षकांची आवडती राहिली आहे.
अमृता खानविलकरला 'चंद्रमुखी' चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली. तसेच तिने 'नटरंग', 'कट्यार काळजात घुसली', 'साडे माडे तीन' चित्रपटात काम केले. तिची 'वाजले की बारा' ही लावणी खूप गाजली.