Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री शिवाली परबला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली. शिवाली परबला कल्याणची चुलबुली म्हणून ओळखले जाते.
शिवाली परब सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. भन्नाट फोटोशूट, डान्स व्हिडीओ तसेच कॉमेडी व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांचे चांगले मनोरंजन करते.
शिवाली परबने हटके स्टाइचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमधील तिचा स्वॅग पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
शिवालीने गडद पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे. तसेच साडीवर ब्लेझर घालून तिने डॅशिंग लूक केला आहे.
साडीला मॅचिंग ज्वेलरी तिने परिधान केली आहे. गळ्यात चोकर- लाँग नेकलेस, हातात बांगड्या, अंगठी, कानातले घालून तिने लूक पूर्ण केला आहे.
डोळ्यांवर काळा गॉगल, केसांचा अंबाडा आणि हाय हिल्स मध्ये तिचे सौंदर्य खुलून आले आहे. लूकला शोभेल असा मेकअप तिने केला आहे.
'चुलबुली शिवा', 'सुंदर', 'लव्ह यू', 'कडक', 'जबरदस्त', भारी स्वॅग' अशा कमेंट्स पाहायला मिळत आहे. तर एका युजरने लिहिलं की, "चांदणे तुझ्या चेहऱ्यावर, जणू आकाशातले तारे...तुझ्या डोळ्यांच्या सागरात, हरवून जाती सारे..."
शिवाली परब या इंडो वेस्टर्न लूकमध्ये खूपच भारी दिसत आहे. तिच्या फोटोतील कातिल पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तसेच प्रेक्षक तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.