Shreya Maskar
कॉमेडियन कपिल शर्माचा 'किस किसको प्यार करू 2' चित्रपट 12 डिसेंबरला रिलीज झाला आहे. चित्रपटाने संथ सुरुवात केली आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार,'किस किसको प्यार करू 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 1.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'किस किसको प्यार करू 2'मध्ये कपिल शर्मा मुख्य भूमिकेत आहे. त्याला सिनेमासाठी तब्बल 2-3 कोटी रुपये मिळाले आहेत. चित्रपटातील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
'किस किसको प्यार करू 2' मध्ये कपिल शर्माने मोहन शर्माचे पात्र साकारले आहेत. ज्याला चार बायका आहेत. चित्रपटासाठी त्रिधा चौधरीने 40-60 लाख पैसे मिळाले.
आयेशा खान एक मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखली जाते. तिने सिनेमासाठी 15-30 लाख रुपये मानधन मिळाले.
पारुल गुलाटीने अनेक जाहिराती, वेब सिरीज, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 'किस किसको प्यार करू 2' साठी 40-60 लाख रुपये फी घेतली.
'किस किसको प्यार करू 2' या चित्रपटासाठी वरीना हुसैनला 20 ते 35 लाख रुपये मानधन मिळाले. हिरा वरीनाने 2018 साली रिलीज झालेल्या 'लवयात्री' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.
अभिनेता मनजोत सिंहने 'किस किसको प्यार करू 2' सिनेमासाठी 50 ते 70 लाख मानधन घेतले आहे.