Shreya Maskar
कॉमेडियन कपिल शर्माचा 'किस किसको प्यार करू 2' चित्रपट 12 डिसेंबरला रिलीज झाला आहे. चित्रपटाने संथ सुरुवात केली आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार,'किस किसको प्यार करू 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 1.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'किस किसको प्यार करू 2' ही कॉमेडी लव्ह स्टोरी आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुकल्पा गोस्वामी हे आहेत.
'किस किसको प्यार करू 2'मध्ये कपिल शर्मासोबत त्रिधा चौधरी, आयशा खान, वारिना हुसेन, पारुल गुलाटी आणि मनजोत सिंग हे कलाकार झळकले आहेत.
'किस किसको प्यार करू 2' चित्रपटाचा पहिला भाग 2015 ला रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
मीडिया रिपोर्टनुसार, थिएटरनंतर 'किस किसको प्यार करूँ 2' चित्रपट जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येणार आहे. चित्रपटाचे ओटीटी स्ट्रीमिंग राइट्स जिओने खरेदी केले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्माचा 'किस किसको प्यार करू 2' चित्रपट 2026 जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये इंटरनेटवर पाहता येईल.
चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आजवर कपिल शर्माने आपल्या कॉमेडीने चाहत्यांना खळखळवून हसवले आहे.