Famous Actress : मौनी रॉयनंतर आणखी एका अभिनेत्रीसोबत Live शोमध्ये गैरवर्तन; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Famous Actress Allegations Of Public Harassment : मौनी रॉयनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने लाइव्ह शो दरम्यान तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Famous Actress
Famous Actresssaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लाइव्ह शो दरम्यान गैरवर्तन करण्यात आले.

अभिनेत्रीने यासंबंधित FIR दाखल केला आहे.

अलिकडेच अशी घटना अभिनेत्री मौनी रॉयसोबतही घडली होती.

अलिकडेच प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयसोबत लाइव्ह शो दरम्यान गैरवर्तन झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता अजून एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अशीच एक वाईट घटना घडली आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि माजी तृणमूल काँग्रेस खासदार मिमी चक्रवर्ती यांच्यासोबत लाइव्ह शो दरम्यान गैरवर्तन करण्यात आले. त्यांनी कार्यक्रम आयोजकांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आणि माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. उत्तर 24 परगणा येथील बोनगाव येथे एका स्टेज परफॉर्मन्स दरम्यान त्यांची छेड काढल्याचा, त्यांच्या सोबत गैरवर्तणुकीचा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. त्यांनी तसा आरोप केला आहे.

रविवारी बोनगाव शहरातील नयाग्राम परिसरात झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. मिमी चक्रवर्ती यांच्या तक्रारीनुसार, आयोजकांपैकी एक तन्मय शास्त्री नावाचा व्यक्ती अचानक स्टेजवर चढला आणि जबरदस्तीने अभिनेत्रीचा परफॉर्मन्स थांबवला.यानंतर, मध्यरात्री त्याने अभिनेत्रीला स्टेजवरून खाली उतरण्यास सांगितले. मिमी सांगितले की, या वर्तनामुळे तिला खूप अपमानित वाटले. अभिनेत्रीने यासंबंधित ईमेलद्वारे बोनगाव पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली.

मिमी चक्रवर्तीने ही घटना सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितली आहे. ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. अभिनेत्रीचे चाहते तिच्याशी झालेल्या गैरवर्तनामुळे खूप निराश आणि संतप्त आहेत. दुसरीकडे, कार्यक्रमाचे आयोजक युवक संघ क्लबने मिमीचे सर्व आरोप खोटे असल्याचे फेटाळून लावले आहे. त्यांचा दावा आहे की मिमी नियोजित वेळेपेक्षा सुमारे एक तास उशिरा आली.

तन्मय शास्त्री आरोपांवर उत्तर देत म्हणाले की, कार्यक्रमाला फक्त मध्यरात्रीपर्यंत परवानगी होती. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या बोर्ड परीक्षांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. यावेळी मिमी चक्रवर्ती यांच्याशी कोणताही गैरवर्तन किंवा छळ करण्यात आला नाही. त्यांचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. शास्त्री यांनी असाही आरोप केला आहे की, मिमीच्या बाउन्सर्सनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. ते म्हणतात की जेव्हा कार्यक्रम रात्री 11.45 वाजता सुरू झाला तेव्हा क्लबच्या महिला सदस्य मिमीचे स्वागत करण्यासाठी स्टेजवर गेल्या, परंतु अभिनेत्रीच्या अंगरक्षकांनी त्यांना जबरदस्तीने काढून टाकले.

तन्मय शास्त्री म्हणाले, "पोलिसांनी आम्हाला फक्त मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रमासाठी परवानगी दिली. मिमी स्वतः एक तासापेक्षा जास्त उशिरा आली. आम्हाला माहित आहे की ती एक मोठी स्टार आहे, परंतु जर आम्ही मध्यरात्रीनंतरही कार्यक्रम सुरू ठेवला असता तर पोलिसांनी येऊन तो बंद केला असता आणि आमच्यावर कायदेशीर कारवाई केली असती. पण जर मिमीला एक महिला आणि एक प्रसिद्ध स्टार म्हणून थोडे जरी कार्यक्रमात अस्वस्थ वाटले असेल तर आम्ही तिची माफी मागतो." पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Famous Actress
Disha Patani : दिशा पाटनीने दिली प्रेमाची कबुली? इव्हेंटमध्ये तलविंदर सिंहचा हात धरून फिरताना दिसली, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com