स्टार प्रवाह वाहिनीने नव्या मालिकेची घोषणा केली.
नवीन मालिकेत ईशा केसकर मुख्य भूमिकेत असल्याचे बोले जात आहे.
'बाईपणा'वर आधारित नवीन मालिका आहे.
नवीन वर्षात स्टार प्रवाह वाहिनीवर नवीन मालिकांची मेजवानी पाहायला मिळत आहे. नवीन 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले', 'वचन दिले तू मला' मालिका सुरू झाली आहे. तर 'तुझ्या सोबतीने' ही मालिका सुरू होणार आहे. 'तुझ्या सोबतीने' मालिका 19 जानेवारी 2025 पासून रात्री 10:00 वाजता पाहायला मिळणार आहे. अशात आता नवीन एका मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. ज्याचा प्रोमो समोर आला आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रोमोमध्ये मालिकेच्या हिरो आणि हिरोईनची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. मात्र त्यांचा चेहरा दाखवण्यात आला नाही. मात्र प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी मालिकेची मुख्य अभिनेत्री ओळखली आहे. नवीन मालिकेत मुख्य झळकणारी अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून ईशा केसकर असल्याचे बोले जात आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, आपला हिरो त्याच्या नववधूला घरात घेऊन येतो. आपल्या घराचे आणि घरातील लोकांचे कौतुक करतो. तो म्हणतो की, "आमचं घर सुंदर आहे. मायेने भरलेले आहे. आमच्यासाठी आमचे घर मंदिर आहे. आमच्या चारी भावांच्या म्हणजे आपल्या घरात तुझे स्वागत हाय..."
'स्टार प्रवाह' वाहिनीवर सुरू होणाऱ्या नवीन मालिकेचे नाव 'बाई तुझा आशीर्वाद' असे आहे. अद्याप मालिकेची रिलीज तारीख आणि वेळ समोर आली नाही. मात्र प्रोमोने प्रेक्षकांच्या मनात मालिकेसाठी उत्सुकता वाढवली आहे.
मराठी अभिनेत्री ईशा केसकरचा मोठा चाहता वर्ग आहे. तिला 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने 'कला' ची भूमिका साकारली. ईशाने मालिकेतून एक्झिट घेतल्यावर काही दिवसांत मालिका देखील संपली. त्यामुळे ईशा केसकर आता नवीन मालिक घेऊन आली असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.