Vachana Dile Tu Mala: 'वचन दिले तू मला' मालिकेत ऊर्जाची पहिली लढाई; उज्ज्वल निकमचा आशीर्वाद घेऊन उतरणार न्यायाच्या रणांगणात

Vachana Dile Tu Mala: स्टार प्रवाहवरील नवी मालिका वचन दिले तू मलामध्ये ख्यातनाम सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आशीर्वादाने अॅडव्होकेट ऊर्जा करणार पहिल्या केसची तयारी. मालिकेच्या सुरुवातीलाचं येणार मोठा ट्विस्ट.
Vachana Dile Tu Mala
Vachana Dile Tu MalaSaam Tv
Published On

Vachana Dile Tu Mala: स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली ‘वचन दिले तू मला’ ही नवी मराठी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, मालिकेतील दमदार कथा आणि सशक्त व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत आहेत. विशेषतः न्यायासाठी झगडणारी, ध्येयवेडी आणि आत्मविश्वासू अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे ही व्यक्तिरेखा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ऊर्जा आता तिच्या आयुष्यातील पहिली महत्त्वाची केस लढण्यासाठी सज्ज झाली आहे. ही केस केवळ तिच्या करिअरमधील पहिली पायरी नसून, तिच्या न्यायप्रेमी स्वभावाची खरी कसोटी ठरणार आहे. न्यायालयात पाऊल टाकण्यापूर्वी ऊर्जाने एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण अनुभवला. तिने प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेतली आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या लढ्याची सुरुवात केली.

Vachana Dile Tu Mala
Sohail Khan: सलमानच्या भावाने हेल्मेट न घालता चालवली बाईक; VIDEO शुट करताच घातली शिवी, आता मागितली माफी

न्यायाच्या मार्गावर चालताना उज्ज्वल निकम यांच्यासारख्या दिग्गज वकिलांची भेट ऊर्जासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली. या भेटीबद्दल ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “उज्वल निकम सरांना भेटून मनापासून आनंद झाला. त्यांनी दिलेला वेळ, प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. हा क्षण मी कायम लक्षात ठेवेन.” अनुष्काच्या या शब्दांतून ऊर्जाच्या भूमिकेबद्दलचा तिचा आदर आणि जबाबदारी स्पष्टपणे दिसून येते.

Vachana Dile Tu Mala
The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

या कथेत आणखी एक खास वळण म्हणजे ऊर्जाच्या पहिल्याच केसमध्ये तिच्यासमोर उभे असलेले आव्हान. वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात ऊर्जा न्यायालयात उभी राहणार आहे. अनुभव, ताकद आणि प्रतिष्ठेच्या विरोधात नवख्या ऊर्जाची ही लढाई केवळ एक कायदेशीर खटला न राहता, न्यायासाठीचा संघर्ष बनणार आहे.

ऊर्जा या संघर्षात स्वतःला कशी सिद्ध करणार? ती सत्य आणि न्यायासाठी किती दूर जाणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी ‘वचन दिले तू मला’ ही मालिका दररोज रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर नक्की पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com