बिग बॉसच्या घरात गायिका प्राजक्ता शुक्रे पहिली कॅप्टन झाली.
आता बिग बॉसमध्ये ६ व्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का रंगणार आहे.
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख तन्वी कोलतेची कानउघडणी करतो.
'बिग बॉस मराठी 6' सुरू झाल्यापासून चाहते भाऊच्या धक्क्याची वाट पाहत होते. अखेर आज-उद्या (शनिवार - 17 जानेवारी ) (रविवार - 18 जानेवारी) बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का थाटात पार पडणार आहे. याची एक झलक नुकतीच समोर आली आहे. पहिल्याच आठवड्यात घरात भांडणे, रडणे, मारामारी, वाद पाहायला मिळाले. या सर्व गोष्टींवर रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे.
बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमो व्हिडीओत रितेश देशमुख तन्वी कोलतेला चांगलेच खडेबोल सुनवताना दिसणार आहे. त्याने तिचा गेम प्लान देखील सांगितला आहे. यामुळे तन्वी देखील रडताना दिसत आहे. या व्हिडीओवर प्रेक्षक कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. "आला रे आला आपला भाऊ आला, आता कल्ला होणार...", "तन्वी कोलते किती बोलते...", "दादा तिला वाटते फक्त भांडण केले म्हणजे बिग बॉस जिंकता येते...","जान्हवी किल्लेकरला पाठवा आत...", "तन्वी पागल आहे..." अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
रितेश देशमुख म्हणतो की, "तन्वी कोलते किती बोलते? तुम्ही आहात या घराच्या 'तंटा क्वीन'... तुम्हाला फक्त बोलायचं असतं, भांडायचं असतं आणि ते झालं की रडायचं असतं... तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालेला आहे..." हे ऐकताच तन्वी कोलते रडायला लागते. त्यानंतर ती 'सर' अशी हाक मारते. तेवढ्यात तिला थांबवत रितेश भाऊ बोलतात की, "मी बोलतोय ना...थांबा एक मिनिट..."
बिग बॉसच्या घरात गायिका प्राजक्ता शुक्रे ही सहाव्या सीझनची पहिली कॅप्टन झाली. नॉमिनेशच्या पतंग कापण्याच्या टास्कमध्ये एकूण नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात दिपाली सय्यद, करण सोनवणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, अनुश्री माने, सागर कारंडे, रोशन भजनकर, दिव्या शिंदे आणि राधा पाटील यांचा समावेश आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे. आता भाऊच्या धक्क्यावर आणखी कोणता राडा होणार पाहणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.