Manasvi Choudhary
जगभरात सर्वत्रच नवीन वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत होते. अवघ्या काही तासांमध्ये भारतात नववर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत होणार आहे.
प्रशांत महासागरातील किरिबाती या देशात सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत झाले आहे.
किरिबातीमधील लाइन आयलंड्स विशेषतः किरितिमाती येथे सर्वात आधी मध्यरात्रीचे १२ वाजतात.
भारतीय वेळेनुसार, ३१ डिसेंबरला दुपारी ३:३० वाजताच तिथे १ जानेवारी २०२६ ची पहाट झाली
भारतीय वेळेनुसार किरिबाती हा देश ८ तास ३० मिनिटे पुढे आहे. जेव्हा भारतात ३१ डिसेंबर २०२५ चे दुपारी ३:३० वाजले होते, तेव्हाच या देशात २०२६ सालाची सुरुवात झाली.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.