Asia Cup, IND vs PAK: देशभक्तीचा व्यापार सुरू आहे – उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल|VIDEO

Pahalgam Attack And Uddhav Thackeray Criticism: उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका करत म्हटले की, देशभक्तीचा व्यापार सुरू आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तान सामना होतोय, हे देशभक्तीची थट्टा असल्याचे ठाकरेंनी सांगितले.

आशिया कप 2025 स्पर्धा सुरू असून उद्या भारत आणि पाकिस्तानमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. यावरूनच देशातील राजकारण देखील तापलेले आहे. आज उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हणाले. पहलगाममधील हल्ल्याची जखम अजूनही भरलेली नसताना हा सामना होत असल्याने उद्विग्न आणि विषण्ण वाटत आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सर्व भारतीय नागरिकांना वाटले होते की आपण पाकिस्तानचे तुकडे करू. त्यादृष्टीने एक चढाई झाली. एक प्रकारे युद्ध झाले. ज्याचे नाव ऑपरेशन सिंदूर ठेवण्यात आले होते. सैन्याने शौर्याची परिसीमा गाठली होती. असे ठाकरे म्हणाले.

आता अचानक काय झाले की पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारले होते आणि आता त्याच पाकिस्तनविरुद्ध सामना खेळणार आहे. ही देशभक्तीची थट्टा आहे. देशभक्तीचा व्यापार सुरू आहे. राजनाथ सिंह आणि अमित शाह यांना हे विचारायचय की तुम्ही हे युद्ध थांबवणार का?

तसेच पंतप्रधानांच्या लेखी हिंदुत्वाची किंमत आहे की नाही व्यापारच आहे? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com