India Pakistan Conflict
भारत-पाकिस्तान दोन देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकड्यांना धडा शिकवला. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानमधून वारंवार सीमेवर गोळीबार, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. भारताकडून पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जातेय. त्यामुळे दोन्ही देशांत युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे.