भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, हिंदुस्थानचे महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी पंतप्रधान, त्यांना असं वाटतं की त्यांच्यासारखा राष्ट्रभक्त जन्मालाच आला नाही, त्यांनी काल त्यांच्या सरकारने एशिया चषक क्रिकेट सामने खास करून पाकिस्तान बरोबर खेळण्यास हिरवा कंदील दाखवला. हा प्रकार धक्कादायक आहे, नरेंद्र मोदी,अमित शहा, राजनाथ सिंग यांच्या राष्ट्रभक्तीचा आणि हिंदुत्वाचा मुखवटा ओरबडून काढण्याचा निकाल काल त्यांनी घेतला. मी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारले, पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्याची जी काय आपल्याला खुमखुमी आहे किंवा खाज आहे त्यासाठी आपण पहलगाममध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना विचारलत का, त्यांच्या भावना समजून घेतल्यात का? आपली अशी कोणती मजबुरी आहे की तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार आहात.
एका बाजूला तुम्ही म्हणताय की पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही, पाकिस्तानला आपण जे सिंधू नदीच पाणी देतो ते आम्ही अडवतो, मग क्रिकेट आणि रक्त एकत्र कसं काय याच उत्तर त्यांना द्याव लागेल. हा निर्लज्जपणा आहे, हे जर दुसरे कोणाचं सरकार असतं आणि हा जर निर्णय घेतला असता तर या लोकांनी संपूर्ण देशभरामध्ये एक आंदोलन उभं केलं असतं, पण प्रधानमंत्री यांनी शांतपणे पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही असं मोदी आणि संरक्षण मंत्री म्हणत आहेत, मग ऑपरेशन सिंदूर संपलेले नसताना ज्या देशाविरुद्ध तुम्ही युद्ध पुकारलेल आहे त्या देशाबरोबर क्रिकेट खेळायचं आहे. या देशातले लोक तिकडे जाणार मॅच बघायला, अमित शहा यांचे सुपुत्र, गुजरातचे सुपुत्र जय शहा ते दुबईत भारत-पाक सामन्याला बसणार ऐटीमध्ये आणि भारताच्या जनतेने पाकिस्तान विरुद्ध नारे द्यायचे, सैनिकांनी हुतात्म्य पत्करायचं, जनतेने प्राण गमवायचे आणि हे पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे ट्रेड करणार हा अत्यंत धक्कादायक आणि बेशरमपणाचा प्रकार आहे, आम्ही त्याचा निषेध केलेला आहे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्यांचं स्पष्ट आणि परखड मत मांडलेलं आहे
ऑपरेशन सिंदूर सुरू असताना, पहलगाममध्ये सांडलेल्या भारतीयांच्या रक्ताचे डाग सुकले नसताना, परके झालेल्या कुटुंबियांचे अश्रू सुकले नसताना पाकिस्तान बरोबर क्रिकेटला परवानगी देण यासारखा सरकारचा बेशरमपणा नाही, आम्ही याचा निषेध आणि धिक्कार करतो. आमचं मन जळतय,आम्ही आक्रोश पाहिलाय, आम्ही ढोंगी नाही, आमचे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व पक्क आहे, भाजप सारखं आम्ही ढोंगी नाही. महाराष्ट्रात किंवा देशात असा सामना झाला असता तर तो सामना उधळून लावण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केला असता, महाराष्ट्रात तर शक्यच नव्हतं पण दिल्लीत जरी झाला असता तर सामना उधळून नरेंद्र मोदी यांना आम्ही चपराक लगावली असते. पाकिस्तान शरण आला होता म्हणताना, मग क्रिकेट कसले खेळत आहे, तुम्ही क्रिकेटमध्ये का शरण जाताय हा साधा प्रश्न आहे अशी घणघाती टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.