Independence Day 2025 : लाल किल्ल्यावर देशभक्तीचा जल्लोष; ‘ऑपरेशन सिंदूर’ला आकाशातून सलामी|VIDEO

Independence Day 2025 Red Fort Helicopter Tribute: ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १२व्या वर्षी तिरंगा फडकावला. “ऑपरेशन सिंदूर”ला १०० दिवस पूर्ण झाल्याने हेलिकॉप्टरवर झेंडा फडकवून भारतीय सैन्याला आकाशातून सलामी देण्यात आली.
Summary

७९ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर सलग १२व्या वर्षी तिरंगा फडकावला.

“ऑपरेशन सिंदूर”ला १०० दिवस पूर्ण झाल्याने विशेष आकाशातील सलामी देण्यात आली.

२१ तोफांची सलामी व राष्ट्रगीताच्या गजराने वातावरण भारून गेले.

नवी दिल्ली: भारताला स्वातंत्र्य मिळून आज 79 वर्ष पूर्ण झाली असून देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सत्तेतून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ देशाच्या राजधानीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12व्या वर्षी तिरंगा फडकावला. ध्वजारोहणानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली व राष्ट्रगीताच्या गजरात संपूर्ण परिसर देशभक्तीने भारून गेला.

यावेळी “ऑपरेशन सिंदूर”ला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, हेलिकॉप्टरवर ऑपरेशन सिंदूरचा झेंडा फडकवून भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com