Pune News: भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी

'Pakistan Zindabad' Post Sparks Controversy: पुण्यातील अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेल्या तरूणीला सोशल मीडियावर 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा आशयाची पोस्ट शेअर करणं चांगलंच महागात पडलं आहे.
Pune News
Pune NewsSaam
Published On

भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात देशविरोधी भावना व्यक्त करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातील एका अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेल्या तरूणीला सोशल मीडियावर 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा आशयाची पोस्ट शेअर करणं चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी तरूणीविरोधात पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली आहे. तसेच न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरातील एका तरूणीने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. पोस्ट व्हायरल होताच तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तरूणीला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune News
Ceasefire: 'हे युद्ध अमेरिकेच्या पापाने थांबवले का?' युद्धबंदीच्या निर्णयावर संजय राऊत संतापले, थेट अंधभक्तांवर टीका

न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. तिच्यावर कोणताही हल्ला होऊ नये किंवा परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी तिच्यासारखाच पेहराव केलेली एक महिला पोलीस कर्मचारी तिच्यासोबत उपस्थितीत होती. यानंतर न्यायालयात तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Pune News
Satara Accident: साताऱ्यात भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, मध्यरात्री ट्रकला धडकली; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

संबंधित तरूणी पहलगाममधील हल्लानंतर आणि अटक करण्यापूर्वी श्रीनगरला गेली होती. तिथे तिने आपल्या नातेवाईकांची भेट घेतली होती. दरम्यान, तिथे असताना देशविरोधी कारवाया करणाऱ्या यंत्रणांच्या संपर्कात आरोपी तरूणी आली होती का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच एटीएसकडूनही तपास होण्याची शक्यता आहे.

Pune News
Raigad: 'पाकिस्तानला समर्थन' रायगडच्या युवकाची पोस्ट व्हायरल, नागरिकांमध्ये संताप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com